शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसाने श्रावण मासातील हर्ष लोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST

अनेकजण गावातील काडीकचरा नदीपात्रात नेऊन टाकतात. यावर्षी नदीला पूर न आल्याने हा कचरा पात्रात कायम आहे. त्यामुळे नदी पात्र अस्वच्छ दिसते. याशिवाय पात्रात गवत उगवल्याने नदीचे स्वरूप पालटल्याचे दिसून येते. याशिवाय गावालगतच्या वृक्ष वेलीची तोड अनेक शेळीपालकांनी केल्याने गावाशेजारील हिरवळही नष्ट झाली आहे. गावाशेजारून वाहणाऱ्या नद्यांचे किनारे उजाड दिसत आहेत.

ठळक मुद्देउकाडा कायम : स्वच्छ, सुंदर नदीपात्रात उगवले गवत; उन्हाळ्यात टाकलेला काडीकचराही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ‘श्रावण मासी, हर्ष मानसी; हिरवळ दाटे चोहीकडे’ या ओळींनी श्रावण मासातील बालकवींनी केलेले वर्णन यावर्षी कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील उकाडा अद्यापही कायम असून दरवर्षी श्रावण महिन्यात स्वच्छ, सुंदर दिसणारे नदीपात्र यावर्षी गवत उगवल्याने बेढब दिसत आहे. यावर्षी आत्तापर्यंत झालेल्या अल्प पावसामुळे श्रावण मासातील हर्ष लोपला.कुरखेडा तालुक्यातील शिरपूर-खरकाडा मार्गावर असलेल्या पुलावरून दिसणारा नदीपात्राचा बराच भाग गवताने व्यापला आहे. दरवर्षी स्वच्छ, सुंदर दिसणारे व रेती पसरलेले नदीपात्र यावर्षी गवत व काडीकचऱ्याने व्यापले आहे.अनेकजण गावातील काडीकचरा नदीपात्रात नेऊन टाकतात. यावर्षी नदीला पूर न आल्याने हा कचरा पात्रात कायम आहे. त्यामुळे नदी पात्र अस्वच्छ दिसते. याशिवाय पात्रात गवत उगवल्याने नदीचे स्वरूप पालटल्याचे दिसून येते. याशिवाय गावालगतच्या वृक्ष वेलीची तोड अनेक शेळीपालकांनी केल्याने गावाशेजारील हिरवळही नष्ट झाली आहे. गावाशेजारून वाहणाऱ्या नद्यांचे किनारे उजाड दिसत आहेत. श्रावण मासात पावसाच्या सरी व कोवळे उन्ह अनुभवास यायचे. त्यामुळे श्रावण मासातील आनंद निराळा असायचा. परंतु यावर्षी अल्प पाऊस व शेतकऱ्यांची हतबलता सर्वकाही नैराश्य देणारे आहे. पूर्वीसारखा अनुभव यावर्षीच्या श्रावण मासात अनुभवता आला नाही. शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसriverनदी