शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात

By admin | Updated: May 1, 2017 00:35 IST

आमच्याकडे आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे सुरू आहे. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे असलेले काम ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे.

 आमच्याकडे आलेल्या तक्रारींवर कारवाई करणे सुरू आहे. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे असलेले काम ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. - भीमराव नांदणे, प्रभारी उपअधीक्षक भूमि अभिलेख, आर्वी. आर्वी : शेतकऱ्यांना सशक्त व संपन्न करण्यासाठी पारदर्शक प्रशासन राबवून जलयुक्त शिवार, राजस्व अभियानासारख्या शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जात आहे. यातच भूमी अभिलेख कार्यालयात मात्र शेतकऱ्यांना एका कामासाठी अनेकदा चकरा माराव्या लागत असल्याचे दिसते. यामुळे भूमिअभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात असल्याचेच दिसते. शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी असलेल्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातून प्रक्रिया पार पाडावी लागते. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या मोजणीची कित्येक प्रकरणे प्रलंबित आहे. भूमिअभिलेख विभागातील उपविभागीय अधिकारी शेतीविषयक कामांना प्राधान्य न देता नगदी मिळणाऱ्या कामांवर लक्ष देत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात. महत्त्वाच्या दिवशीही कार्यालयात दुपारनंतर सुकसुकाट असतो. लहान -सहान कामासाठीही नागरिकांना नाहक त्रास दिला जात असून साध्या पीआर कार्डसाठीही पैसे मोजावे लागत आहेत. एकंदरीत भूमिअभिलेख कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अधिकारी व कर्मचारी कामात असल्याचे भासवित असून मोबाईलवर व्यस्त दिसतात. शेतकऱ्यांच्या शेतांची मोजणी करण्यासाठी भूमापकांची संख्या कमी असल्याचे कारण दाखवून प्रलंबित प्रकरणे कार्यालयात धूळखात पडलेली आहेत. पालकमंत्री राजस्व व जलयुक्त शिवार अभियानातून शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जाते; पण भूमिअभिलेख कार्यालयाचा गलथान कारभार रोखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पैसे घेऊन काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)