लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:08+5:30

तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे.

Lallanala project a headache for farmers | लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

Next
ठळक मुद्देधरण वर्धा जिल्ह्यात; पाण्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्याला!

सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्यात लालनाला प्रकल्प आहे; मात्र मुसळधार पाऊस आल्यास धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नदीकाठावरील घरांना धोका होतो. शिवाय प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना लाभ मात्र, चंद्रपूरला होतो. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे. तसेच कोरा, उसेगाव, तळोदी, अकोला, गणेशपूर, कृष्णापेठ, पाताळकोट, साखरा, दसोडा, सिल्ली, मंगरूळ, गाठवदेव महारमजरा, गाडामोडी या गावांतील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.
या गावातील शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन धरणाला अल्प मोबदल्यात दिली. धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण असताना अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित असून मजुरी करून हलाखीचे जीवन जगत आहे. प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना त्याचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न मिळता चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राला दिले जात आहे. आतातर चक्क भूमिगत जलाहिनी टाकून चिमूर भागात पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मध्यंतरीच्या काळात माया ठवरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारे पाणी अडविण्याकरिता आंदोलन केले. आंदोलन दडपण्यात आले. या धरणात पाण्याचा साठा २७६१३ दलघमी असून लांबी ३३१५ मीटर, उंची १४६१ लिटर आहे. सद्यस्थितीत धरण भरले असून थोडाही पाऊस आला तर धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नाल्याच्या दोन्ही काठावरच्या जमिनी खरडून वाहून जात असल्याने शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धरणग्रस्त अनेक बाबीने त्रस्त आहेत.

शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का?
लालनाला प्रकल्प समुद्रपूर तालुक्यात आहे. त्यामुळे येथील शेतीक्षेत्र सिंचनाखाली यायला हवे. मात्र, प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना दिला जात नसून चंद्रपूर जिल्ह्यात महाऔष्णिक केंद्राला दिले जाते. पाणी चिमूर भागात पळविण्याचेही कटकारस्थान सुरू असताना शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न केला जात आहे.

Web Title: Lallanala project a headache for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण