शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बसफेऱ्यांअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे.  परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेकांना पर्याय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. यामुळे खासगी वाहनाचे मालक अव्वाच्या सव्वा दर आकारून नागरिक व विद्यार्थ्यांची सर्रास लूट करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दिवसात आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात. खासगी वाहनाव्यतिरिक्त पर्याय नसल्याने नागरिकांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना गाडीत डांबून बसविले जाते. यामुळे अपघाताचा धोकाही बळावला आहे. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अनेक नागरिकांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बंदचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येते.  काही विद्यार्थी तर चक्क पायदळ किंवा सायकलने शाळेपर्यंत अंतर गाठताना दिसतात. हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडीत विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच खासगी वाहनाच्या प्रतीक्षेत बसावे लागते. प्रवासाचे दरही दीड-दोन पट वाढल्याने हातमजुरी, शेती करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोग्या नाही. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर एवढा मोठा संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याने आता तरी आमची लालपरी सुरू व्हायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बसफेरी बंद असल्याने दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. वेळेवर शाळेत देखील पोहोचता येत नाही.  खासगी वाहनात एक प्रकारचे मोठे संकट डोक्यावर घेऊनच प्रवास करावा लागतो. प्रवासाचे भाडेही ठरले नाही. त्यामुळे आमची लूट चालवली जात आहे.- भावना गावंडे, विद्यार्थिनी.

बंद बसफेऱ्या अभावी दररोज मुलांना शाळेत खासगी वाहनाने पाठवावे लागते. त्यामुळे मुले शाळेतून परत घरी येईपर्यंत मनात एक प्रकारची भीती असते.- अरुण वंजारी, पालक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप