अंधश्रद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणे भयंकर

By Admin | Updated: December 10, 2014 23:02 IST2014-12-10T23:02:55+5:302014-12-10T23:02:55+5:30

रूपेश मुळेची निर्घृण हत्या ही अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून केलेली अमानुष कृती होती. अंधद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणाऱ्यांचे ते षढयंत्र मानवनिर्मित आपत्तीचा भाग आहे.

It is terrible to cultivate interest by using superstition | अंधश्रद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणे भयंकर

अंधश्रद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणे भयंकर

वर्धा : रूपेश मुळेची निर्घृण हत्या ही अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून केलेली अमानुष कृती होती. अंधद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणाऱ्यांचे ते षढयंत्र मानवनिर्मित आपत्तीचा भाग आहे. तसेच ती दैवी दहशतवादी निष्पती आहे, असे प्रतिपादन महाराष्ट ्रअनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनुभव शिक्षा केंद्र व महाराष्ट्र युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी प्रबोधन परिषद वर्धा येथील मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अतिथी म्हणून प्रा. ज्ञानेश वाकुडकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे भूईबार, अप्पर पोलीस अधीक्षक आर.जी. किल्लेकर, जनवादी महिला संघटनेच्या सरचिटणीस प्रभा घंगारे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाची राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते.
वर्धा जि.प. चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दवले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटनकर, सुधीर भगत अनुभव शिक्षा केंद्राचे समन्वयक नितीन मते महाराष्ट्र अनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, संजय ठाकरे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुरेश वरभे व चंद्रपुरचे कार्याध्यक्ष पी.एम. जाधव, शारदा झामरे, प्रा. जनार्दन देवतळे, गुणवंत डकरे, संयुक्त नंदकुमार वानखेडे, बाबाराव किटे, जिजाऊ ब्रिगेडच्या वानखेडे उपस्थित होते प्रास्ताविक राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी केले. संचालन प्रा. माधुरी झाडे व प्रकाश कांबळे यांनी केले. आभार सारिका डेहनकर यांनी मानले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: It is terrible to cultivate interest by using superstition