शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

८,००५ व्यक्तींची गृहभेटीतून तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

सदर गावांची एकूण लोकसंख्या ८ हजार ५ च्या घरात असून आरोग्य विभागाच्या विशेष चमूंच्या सहाय्याने गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच घसा दुखीची लक्षणे आहेत काय याची शहरनिशा केली जात आहे. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या एकूण २५ चमूद्वारे हे काम सतत १४ दिवस केले जाणार आहे.

ठळक मुद्देहिवरा तांडा प्रकरण : २८ व्यक्तींचे घेतले स्वॅब, कन्टेमेंट अन् बफर झोन तयार करून घेताहेत दक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दक्षता म्हणून हिवरा तांडासह हिवरा, जामखुटा, राजनी, हरर्शी, बेलारा, दहेगाव (मु.), बोथली (कि़) बेल्हारा तांडा, पाचोड या गावांचा कंटेन्मेट झोनमध्ये समावेश करून ही गावे सील करण्यात आली आहेत. सदर गावांची एकूण लोकसंख्या ८ हजार ५ च्या घरात असून आरोग्य विभागाच्या विशेष चमूंच्या सहाय्याने गृहभेटी देऊन कुठल्या व्यक्तीमध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच घसा दुखीची लक्षणे आहेत काय याची शहरनिशा केली जात आहे. आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या एकूण २५ चमूद्वारे हे काम सतत १४ दिवस केले जाणार आहे. हिवरा तांडा येथील मृत महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर अकरा जवळच्या नातेवाईकांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.मृत महिलेचा पती अवैध दारूविक्रेता; आर्वी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखलजिल्ह्यात दारूबंदी असली तरी पोलिसांच्या आर्शीवादाने हा अवैध व्यवसाय जिल्ह्यात चालत असल्याचे वास्तव आहे. शिवाय त्याबाबतचे वास्तव अनेक कारवाईत पुढे आले आहे. हिवरा तांडा येथील कोरोना बाधित मृत महिलेला मागील १५ वर्षांपासून दम्याचा आजार होता. इतकेच नव्हे तर तिचा पती दारूविक्रीचा व्यवसाय करायचा. त्याच्यावर आतापर्यंत वेळोवेळी कारवाई करून पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये तीन वेळा गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय लॉकडाऊनमुळे सदर व्यक्तीचा पानटपरी बंद झाली होती, असे आतापर्यंतच्या पोलीस चौकशीत पुढे आले आहे.वाशीम येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचेही तपासणीसाठी पाठविले स्वॅबसावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात न्यूमोनियाच्या उपचारासाठी दाखल झालेल्या ६४ वर्षीय रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर एकूण ११ व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सदर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गाठले गावगुरूवारी सकाळी कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होताच प्रशासनाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या. गुरूवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी हिवरा तांडा गाठून ग्रामस्थांशी संवाद साधला. शिवाय अधिकची माहिती जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील घ्यावयाची खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली.१४१ व्यक्ती होम क्वारंटाईनमृतकाचे नातेवाईक असलेल्या आणि संपर्कात आलेल्या दहेगाव मुस्तफा आणि बोथली या दोन गावानाही प्रतिबंधित करून सील करण्यात आले आहे. आतापर्यंत निकट संपर्कात आलेले २८ व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून ११ व्यक्तींना उपजिल्हा रुग्णालयात अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच आर्वीतील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका यांचेही स्वाब घेऊन दक्षता म्हणून रुग्णालय सील करण्यात आले आहे. तर इतर गावातील संपर्कात आलेल्या १४१ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आंजी (मोठी) येथील जिनिंग सील करून जिनिंग मालकाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या