शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा कुचकामी

By admin | Updated: October 25, 2014 01:42 IST

ग्रामीण भागात असलेली इंटरनेट सुविधा नेहमीच खंडीत होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे.

वर्धा : ग्रामीण भागात असलेली इंटरनेट सुविधा नेहमीच खंडीत होत असल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. येथील नागरिकांना एका प्रमाणपत्राकरिता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. यात त्याची मजुरी जात असून प्रवासाच्या खर्चाचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या हिंगणघाट पंचायत समितीत ७६ च्या जवळपास ग्रामपंचायत कार्यालये आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणकासह आॅनलाईन सेवा पुरविण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घेतली आहे. सर्व प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहे. मात्र संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दुर्लक्षाने आॅनलाईन सेवेचे तिनतेरा वाजले आहे. यामुळे प्रमाणपत्रासाठी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्रे घ्यावे लागतात. यासाठी नागरिकांना खर्च येत असल्याने संगणकीय प्रमाणपत्र ग्रामीण भागासाठी डोकेदुखी ठरत आहे. याकडे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. वेणी येथील मेश्राम यांच्या मुलाला वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी सरपंचाचे प्रमाणपत्र पाहिजे होते; परंतु येथील ग्रामपंचायत कार्यालयात संगणक, टोनर, रिम, पेपर आदी साहित्यासह इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने त्याला अडचणीचा सामना करावा लागला. केवळ ग्रामस्थांनाच नाही तर येथील उपसरपंच कैलास तेलंगे, धनराज ठाकरे, नरेश गंगापारी यांनाही विविध प्रमाणपत्रे पाहिजे होती. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्रे घ्यावी लागली.काही ठिकाणी भेटी दिल्या असता ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक आॅपरेटरच्या घरी वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी जावे लागत आहे. काही ग्रामपंचायतच्या संगणकचालकांनी झेरॉक्सची दुकाने थाटली आहेत. शासन आम्हाला पगार देत नसल्यामुळे झेरॉक्सच्या माध्यमातून घर खर्च चालवत असल्याचे बोलण्यास येथील कर्मचारी मागे येत नाही. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष हेच एक कारण आहे. हा सर्व प्रकार हिंगणघाट पंचायत समितीमधील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये सुरू असताना आॅनलाईनसेवा कमी आॅफलाइन सेवा सुरू आहे. याकडे गटविकास अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष असून ते या सर्व बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)