शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्पायर अवॉर्ड व पायाभूत चाचणीचा प्रारंभ एकाच दिवशी

By admin | Updated: September 10, 2015 02:39 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीचे वेळापत्रक निर्धारित केले.

प्रदर्शन पुढे ढकला : शिक्षक समितीची मागणीवर्धा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत पायाभूत चाचणीचे वेळापत्रक निर्धारित केले. याच कालावधीत जिल्ह्याच्या इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामुळे पायाभूत चाचणीचे कार्यान्वयन प्रभावित होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत प्रदर्शन पुढे ढकलावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने बुधवारी केली. उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या अनुदानातून इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन जिल्हास्तरावर दरवर्षी घेतले जाते. यावर्षी १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शन आयोजित आहे. राज्य शासनाने २२ जून रोजी शासन निर्णय निर्गत करून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू केला. यात सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांच्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रथम भाषा व गणित विषयाची पायाभूत चाचणी १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत घ्यायची आहे. राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचे वास्तव पूढे येणार असल्याने चाचणीचे महत्त्व मोठे आहे. चाचणी व प्रदर्शन दोन्हीचा शुभारंभ एकाच दिवशी होत आहे. याच कालावधीत सुट्या व सण आहेत. परिणामी, चाचणी कार्यान्वयन करणे अडचणीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेत इन्स्पायर अवार्ड प्रदर्शन पूढे ढकलावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाला निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)