शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी उड्डानपूल धोक्याचा

By admin | Updated: April 23, 2016 02:15 IST

वर्धा, बरबडी, सेवाग्राम, हिंगणघाट या मार्गांना जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डानपुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

दुरुस्तीकडे दुर्लक्ष : पादचारी मार्ग उखडला; अपघाताचा धोका सेवाग्राम : वर्धा, बरबडी, सेवाग्राम, हिंगणघाट या मार्गांना जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डानपुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मात्र या पुलाची डागडुजी करण्यात येत नसून पुलाच्या देखभालीकडे संबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पुलावर खड्डे पडले आहे. याची डागडुजी केल्यावर खड्डे जैसे थे झाल्याने वाहन चालकांना येथून रस्ता काढताना चांगलीच कसरत करावी लागते.महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचा परिसर तसेच सेवाग्राम रुग्णालय, आश्रम, हिंगणघाट तसेच परिसरातील गावांना या पुलाने जोडले आहे. हा रस्ता पुढे धोत्रा चौफुलीजवळ जोडल्या जातो. त्यामुळे येथून जडवाहतूक होते. सेवाग्राम येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या पुलाला इंदिरा गांधी उड्डानपूल असे नाव देण्यात आले आहे. या पुलावरून तीन दिशने मार्ग जातात. रस्ते व पूल हे विकासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे विकासाला गतीमान करण्याचे काम केले जाते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.इंदिरा गांधी उड्डानपुलामुळे वर्धा, सेवाग्राम, म्हसाळा व परिसरातील नागरिकांची सुविधा झाली. मात्र येथील पुलाची दैनावस्था झाल्याचे दिसून येत आहे. येथील लोकवस्ती वाढल्याने येथे गर्दी असते. येथून सर्व प्रकारची वाहने दिवसरात्र धावतात. सकाळी १० वाजता आणि सायंकाळला ५ ते ७ यावेळेत वाहनांची अधिक गर्दी होते. वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत अरुंद ठरतो.वैशाली नगर, धन्वंतरी नगर, महिलाश्रम, म्हसाळा या परिसरातील नागरिक या रस्त्याने फिरायला जातात. या पुलावर पहाटे व रात्रीला फिरायला येणाऱ्यांच्या संख्या अधिक आहे. मात्र पादचारी मार्गावर खोल खड्डे आहे. या खड्ड्यात अडखळून पडण्याचा धोका नागरिकांना असतो. येथील पथदिवे अनेकदा बंद असतात. पुलावरील पादचारी मार्ग अनेक ठिकाणी तुटल्याने यावरुन चालावे कसे हा प्रश्न नागरिकांना पडतो. अशातच किरकोळ अपघात होण्याची शक्यता असते. संबंधीत विभागाकाडून याची डागडुजी करणे गरजेचे झाले आहे. येथील पुलावरील खड्डे दुरूस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.(वार्ताहर)