शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून शेतकऱ्यांना वाढीव अनुदान

By admin | Updated: January 19, 2017 00:18 IST

शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट

सोयाबीन उत्पादकांना दिलासा : शेतकऱ्यांकडून प्रस्ताव अपेक्षित हिंगणघाट : शासनाकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. उत्पन्नातील घट आणि अत्यल्प मिळालेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाने वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन विकलेल्या बाजार समितीमध्ये प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. हे सोयाबीन अनुदान प्रती क्विंटल २०० रुपये प्रमाणे अधिकाधिक २५ क्विंटलपर्यंत देण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत बाजार समितीमध्ये विकलेल्या सोयाबीनपोटी हे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीमध्ये आपले सोयाबीन विकले, त्या बाजार समितीकडे शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठवावे लागणार आहेत. यात २५ क्विंटलपर्यंत म्हणजेच ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ज्या शेतकऱ्याने सोयाबीनची विक्री केली, अशा शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० व अधिकाधिक २५ क्विंटल प्रती शेतकरी हे अनुदान देण्यात येत आहे. हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात तीन महिन्यांच्या कालावधीत सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी विक्री पावती, चालू वर्षाचा सातबारा, राष्ट्रीयकृत बॅँक बचत खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड व तलाठ्याचे सोयाबीनबाबत पेरापत्रक आदी कागदपत्रासह समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावा. सदर प्रस्ताव पडताळणी करून उचित कार्यवाहीकरिता वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केलेल्या बाजार समित्यांमध्येही प्रस्ताव सादर करता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)