शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गिरड जंगल परिसरात मोरांच्या शिकारीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी आपले लक्ष्य करीत आहे. या परिसरात शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहेत. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवनविभाग अनभिज्ञ : जनजीवन सुनसान

लालसिंह ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : हे पर्यटनात समाविष्ट केलेले गाव आहे. या गावाला निसर्गाची कृपादृष्टी लाभली आहे. आजुबाजुचा संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. शेख फरीद देवस्थान टेकडी हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे. या टेकडीच्या मागच्या बाजुला घनदाट जंगल असून या परिसरात वर्षभर हिरवळ असते. त्यामुळे टेकडीवरून पर्यटक या गोष्टींचा आनंद घेतात. या टेकडीला लागुनच खुर्सापार जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राणी, पक्ष्यांचा या ठिकाणी मुक्तसंचार असतो. राष्ट्रीय पक्षी मोर हा येथे ेनागरिक,पर्यटकांना मुक्तपणे वावरतांना आढळतो. त्या पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण म्हणजे उत्तम जैवविविधतेमुळे आणि पोषक वातावरणामुळे मोरांचा अधिवास येथे नेहमी असतो मात्र या मोहक राष्ट्रीय पक्ष्यांला शिकाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आहे. या परिसरात मोरांचा स्वच्छंदी वावर असल्याने या मोरांना शिकारी आपले लक्ष्य करीत आहे. या परिसरात शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहेत. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात हरीण, ससे, निलगाय, मोर, अस्वल, बिबट अशा विविध प्राण्यांचा मुक्त संचार आहे. मात्र गावागावातील तस्करापासून वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र मानवी हालचाल थंडावल्या आहेत. निर्जन रस्ते वनविभाग हलगर्जीपणा यामुळे गेल्या काही दिवसापासून तस्करांनी आपला मोर्चा मोराकडे वळविला आहे. वाढणाºया शिकारीमुळे परिसरातील वन्य पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. या परिसरातून मोर नामशेष होण्याची शक्यता आहे.लॉकडाऊन काळात सर्व कामे बंद असताना वनविभाग सक्रियपणे जबाबदारी पार पाडत होता. वनरक्षकासोबत मी स्वत या भागात गस्त घालत होतो. काही शिकाऱ्यांनी आपला मोर्चा मोर्चाकडे वळविला ही माहिती गावातील तरुणाकडून मिळताच खबरदारीचे उपाय म्हणून पुन्हा गस्त वाढविण्यात येईल.मोरांच्या शिकारीवर आळा घालण्यात येईल- एस.एन.नरडंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, गिरड.

टॅग्स :forest departmentवनविभागtourismपर्यटन