शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात अडथळा करणाऱ्यांना दंडासह कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

आरोपी भाऊराव व त्याचे दोन मुले घनश्याम, शुभश्याम, मुलगी अलका व मोहन डफरे सर्व रा. नांदोरा (ड.) ता. देवळी यांनी २३ एप्रिल २०१२ ला सकाळी ११.३० वाजता नांदोरा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तक्रारकर्ता महेंद्र राहाटे रा. वर्धा यांच्या मालकीचे शेताची मोजणी पोलीस संरक्षणात शासकीय पद्धतीने सुरू असताना हा प्रकार घडला. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दुखापत पोहोचविली.

ठळक मुद्देजिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या भाऊराव जामणकर आणि शुभश्याम भाऊराव जामणकर यांना भादंविच्या कलम ३५३ अंतर्गत १ वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर आरोपी घनश्याम याला १ वर्ष सश्रम कारावास व आर्थिक दंडाची शिक्षा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी ठोठावली.प्राप्त माहितीनुसार, आरोपी भाऊराव व त्याचे दोन मुले घनश्याम, शुभश्याम, मुलगी अलका व मोहन डफरे सर्व रा. नांदोरा (ड.) ता. देवळी यांनी २३ एप्रिल २०१२ ला सकाळी ११.३० वाजता नांदोरा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तक्रारकर्ता महेंद्र राहाटे रा. वर्धा यांच्या मालकीचे शेताची मोजणी पोलीस संरक्षणात शासकीय पद्धतीने सुरू असताना हा प्रकार घडला. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दुखापत पोहोचविली. शिवाय पोलिसांसमोर आरोपीतांनी तक्रारकर्ता महेंद्र राहाटे याला कुऱ्हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. शुभश्याम याने मारलेल्या कुºहाडीचा मार हुकल्याने तक्रारकर्त्याला कोणतीही जखम झाली नाही. त्यामुळे न्यायालयाने भादंविच्या कलम ३०७ मधून शुभश्यामची तसेच मोहन डफरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात १२ साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. जखमी जमादार बाबाराव बोरकुटे, डॉक्टरच्या बयाणावरून मारहाण सिद्ध झाल्याने तसेच भाऊराव, घनश्याम व शुभश्याम यांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध झाल्याने न्यायालयाने भाऊराव, घनश्याम यांना १ वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच घनश्यामला ३५३ व ३३२ कलमांतर्गत १ वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय बाजू अ‍ॅड. अमोल कोटंबकर यांनी मांडली. शासकीय बाजू मांडणारे अ‍ॅड. अमोल कोटंबकर यांना पैरवी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यांच्याच मदतीने साक्षदारांना न्यायालयात हजर करून त्यांची साक्ष तपासण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालय