जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: June 8, 2014 00:06 IST2014-06-08T00:06:28+5:302014-06-08T00:06:28+5:30

जिल्ह्यातील बोर व अन्य कालव्याच्या दुरूस्तीच्या कामांना उन्हाळा संपायला येऊनही अद्याप सुररुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्त्यांना गती देण्याची मागणी किसान अधिकार

Ignore the repair of irrigation projects in the district | जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष

वर्धा : जिल्ह्यातील बोर व अन्य कालव्याच्या दुरूस्तीच्या  कामांना उन्हाळा संपायला येऊनही अद्याप सुररुवात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या दुरूस्त्यांना गती देण्याची मागणी किसान अधिकार अभियाच्यावतीने निवेदनाद्वारे विभागीय अधीक्षक अभियंता जे. एम. शेख यांना करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अभियानच्यावतीने शेख यांना विचारणा केली असता संबंधित कालव्यांच्या दुरूस्तीच्या कामाचे कंत्राट अजूनही पारित झाले नसल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा सिंचन विषयक आढावा बैठक सेलू तालुक्यातील बोर धरण येथील सिंचन विभागाच्या विश्राम गृहावर घेण्यात आली. यात चंद्रपूर विभागीय अधीक्षक अभियंता जे. एम. शेख यांना किसान अधिकार अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे व जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी निवेदन सादर केले व कॅनालच्या लिकेजेस व जर्जर अवस्थेची माहिती दिली.
पावसाळ्याला केवळ १५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. इस्टीमेट पारीत करण्यास वेळ लावल्यास आवश्यक दुरूस्त्यांची कामे होणार केव्हा? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात त्याचा वाईट परिणाम पावसाळ्यात व रबीच्या हंगामात परिसरातील शेतकर्‍यांना व स्थानिक नागरिकांना भोगावा लागेल. आपल्या व्यवस्थापकीय अनियमिततेचा त्रास शेतकर्‍यांना होऊ नये याकरिता विविध उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात आली.
स्थानिक लोकसमित्यांची स्थापना गावा-गावात पुन्हा करून आवश्यक ती कामे तत्काळ करण्याचे आदेश उपस्थित कार्यकारी अभियंता ढवळे व सहाय्यक अभियंत्यांना शेख यांनी दिले. कार्यालयीन त्रुटी शोधण्यात वेळ निघून जातो त्यामुळे कामाला गती देण्यास जिल्ह्यातील अधिकार्‍यांना आदेश द्यावे असे निवेदन किसान अधिकार अभियान तर्फे करण्यात आले. निवेदन अभियानचे  सेलू तालुकाध्यक्ष विठ्ठल झाडे, वर्धा तालुकाध्यक्ष भाऊराव काकडे, गोविंदा पेटकर, एकनाथ बरबडीकर, आशिष राऊत, भैय्यासाहेब दरणे, गजानन नेहारे आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)
 

Web Title: Ignore the repair of irrigation projects in the district