कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीचे एका राजकीय नेत्याने मानसिक, लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला. तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून आणि शिक्षणासाठी मदत करतो म्हणत या नेत्याने तिला विश्वासात घेतले आणि जवळीक वाढवली. त्यानंतर प्रकरण इतकं वाढले की, तो थेट तिला म्हणाला, तुझ्यासोबत आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध ठेवायचे आहेत.
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नेत्याने आमिष दाखवून मेसेज करायला सुरुवात केली. तो अश्लील मेसेज करायचा. दिवाकर गमे असे गुन्हा दाखल झालेल्या राजकीय नेत्याचे नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे.
दिवाकर गमे याने तरुणी १७ वर्षांची असतानाच तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. तो पीडितेला नीट परीक्षेचे क्लास लावून देतो म्हणून नाशिकला घेऊन गेला होता. त्याठिकाणी तो तिच्यासोबतच राहिला आणि तिथेच त्याने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती. पण, पीडितेने त्याला विरोध केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीने नोकरी देण्याचे आमिष दाखवले, त्यानंतर तो अश्लील वर्तन करू लागला. तिला अश्लील फोटो, व्हिडीओ पाठवू लागला. त्याचबरोबर मानसिक त्रासही देत होता. आरोपीने नंतर तिला पॉर्न व्हिडीओ वेबसाईटच्या लिंक पाठवणेही सुरू केले. व्हिडीओ दिसतात तसेच आपण शरीरसंबंध ठेवू असे तो पीडितेला म्हणत होता, असा आरोप तरुणीने केला आहे.
आरोपी तरुणीला म्हणाला की, मला तुझ्यासोबत आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र शरीरसंबंध ठेवायचे आहेत. त्यासाठी तो तरुणीवर दबाव आणू लागला होता. हे सगळं प्रकरण असह्य झाल्यानंतर पीडितेने तिच्या कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि घरातून निघून जाण्यास सांगितले, असेही तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
घर सोडल्यानंतर तरुणी तिच्या एका मैत्रिणीकडे राहू लागली. आरोपी गमेचा त्रास सुरू होता. त्यानंतर तिने पुलगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याला हिंगणघाट येथून अटक करण्यात आली.
Web Summary : A politician in Maharashtra was arrested for sexually harassing a 21-year-old college student. He lured her with job offers and financial aid, then demanded she have sex with him and her friend. Police have filed charges and made an arrest.
Web Summary : महाराष्ट्र में एक नेता को 21 वर्षीय कॉलेज छात्रा को यौन उत्पीड़न करने के आरोप में गिरफ्तार किया गया है। उसने नौकरी और वित्तीय सहायता का लालच दिया, फिर उससे और उसकी दोस्त से सामूहिक यौन संबंध बनाने की मांग की। पुलिस ने मामला दर्ज कर गिरफ्तारी की है।