शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा-हिंगणघाट मार्ग जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

रात्रीचे खोदकाम केले जात असल्याने सूचना फलकाअभावी हे खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. चार दिवसांत दोघांचे अपघात झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा वाढत असल्याने नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसूचना फलकाचा अभाव : कंत्राटदाराचा निष्काळजीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : हिंगणा ते हिंगणघाट मार्गाचे काम संथगतीने सुरु असून या बांधकामादरम्यान कंत्राटदाराने कुठलेही सूचना फलक लावले नाही. मार्गावर रात्रीचे खोदकाम केले जात असल्याने सूचना फलकाअभावी हे खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. चार दिवसांत दोघांचे अपघात झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा वाढत असल्याने नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.हिंगणा ते हिंगणघाट या मार्गाचे काम सुरु झाले असून या मार्गादरम्यानच्या हिंगणी ते सेलू पर्यंतच्या मार्गाची पूर्णत: चाळणी झाली आहे. या मार्गावरुन वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तरीही कामाची गती मंदच असल्याने हे बांधकाम आता जीवघेणे ठरत आहे. मार्गाच्या रुंदिकरणासोबतच दोन्ही बाजुला सिमेंटच्या नाल्या करण्यासाठी खोदकाम करण्यात आले. तसेच मार्गावरही भरावा टाकण्याकरिता खोदकाम करण्यात आले. मार्गाचे काम सुरु असल्याने बांधकामासंदर्भात सूचना फलक लावणे बंधनकारक आहे.मात्र कंत्राटदाराने कुठेही सूचना फलक लावले नसल्याने नागरिकांची वाहने खड्डयात शिरुन अपघात होत आहे. दोन दिवसापूर्वी हिंगणी येथील राकेश पोकळे हे सेलू येथून हिंंगणीला येत होते. रात्री १ वाजताच्या सुमारास किन्ही गावानजीक खोदण्यात आलेल्या नालीच्या खड्डयात त्यांची दुचाकी गेली.या ठिकाणी सूचना फलक नसल्याने हा अपघात झाला असून त्यांनी किन्ही येथील अमर धोटे यांनी सेलुच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता सेवाग्रामला हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शनिवारी रात्री गणेश खडगी हे सेलू येथून हिंगणीला जात होते. त्यांचाही याच मार्गावर सूचना फलका अभावी अपघात झाला. तेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यामध्ये नागरिकांशी दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे अनेकांची दिशाभूल होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये वाढतोय रोषहा मार्ग वर्दळीचा असल्याने या मार्गावर ग्रामीण भागातील नागरिकांची दिवसरात्र वर्दळ असते. त्यामुळे बांधकामादरम्यान कंत्राटदाराने सूचना फलक लावणे आवश्यक आहे. सकाळी मोकळ्या असलेल्या मार्गावर रात्री खड्डा केला जात असल्याने वाहनचालकांनाही या मार्गाचा अंदाज येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तरीही कंत्राटदाराकडून खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.कंत्राटराच्या या मनमर्जी कारभाराकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे तत्काळ या मार्गावर सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा