शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या सहकार्याने सेलू शहराची पालटली दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली.

ठळक मुद्देशारदा माहुरे : शहरातील विविध विकासकामांची पायाभरणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विकासापासून कोसोदूर असलेल्या सेलू शहराच्या विकासाकरिता आमदार डॉ. पंकज भोयर यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून शहराची दशा आणि दिशाही बदलली आहे. आताही शहराची विकासाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे, असे मत सेलूच्या नगराध्यक्ष शारदा माहुरे यांनी व्यक्त केले.सेलू शहरातील विविध विकासकामांची पायाभरणी बुधवारी खासदार रामदास तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष शारदा माहुरे, भाजपाचे पदाधिकारी जयंत कावळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, सेलू नगरपंचायतचे गटनेते शैलेंद्र दफ्तरी, नगरपंचायत उपाध्यक्ष अनिल काटोले, माजी सभापती शैला शब्बीर अली, भाजप सेलू शहरप्रमुख शब्बीर अली, नगरसेवक चुडामण हांडे, सन्नी खोडे, वैशाली पाटील, प्रेमा जगताप, कल्पना कळसाईत, हिंमतशहा अली, राजू जयस्वाल यांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष शारदा माहुरे म्हणाल्या, आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. यातून शहरातील विविध रस्ते, नाल्या, स्मशानभूमी विकास, मटण व मच्छी मार्केट आदीच्या कामांना गती मिळाली आहे. यापूर्वीदेखील कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असून त्या अंतर्गत विविध विकासकामे झाली आहेत. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात सेलू शहरासोबतच तालुक्याचा समतोल विकास होत आहे. शहरातील बसस्थानकाचे काम देखील प्रगतिपथावर आहे. त्यामुळे त्यांच्या या विकासात्मक धडपडीला भक्कमपणे साथ देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्यात. या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर