शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेकरिता करावी लागते १० किमीची पायपीट

By admin | Updated: February 9, 2015 23:19 IST

बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास

बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास नागरिकांना सेलू येथे जाण्याखेरीज गत्यंतर नसते. हिंगणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना १० किमी अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. हिंगणी ग्रामपंचायत अंतर्गत धामणगाव, शिवणगाव, वानरविहरा, देवनगर या गावांचा समावश होतो. तर एक किमी अंतरावर असलेल्या किन्ही, मोही, ब्राह्मणी या गावाचा यात समावेश आहे. शासनाने येथे अ‍ॅलोपॅथिक दवाखाना सुरू केला आहे. परंतु उपचार करून घेण्यासाठी सेलू येथे ग्रामीण रूग्णालयात जाण्याखेरीज पर्याय नसतो. जंगलव्याप्त भागात असलेल्या सालई (कला) येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या गावातील नागरिकांना सालई येथे जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. हिंगणी गावापासून दोन कि.मी अंतरानंतर व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. या परिसरात हिंसक श्वापदांचा सातत्याने वावर असतो. अनेकदा जंगली श्वापदांकडून मानव व पशुंवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बोर अभयारण्याकडे जाण्याकरिता हाच मार्ग आहे. पर्यटन स्थळाकरिता बोर गावावरून मार्ग जात असून किरकोळ अपघात होतात. अशा स्थितीत जखमींना सेलू येथे नेऊनच उपचार करावे लागतात. सेलू येथील ग्रामीण रूग्णालयाचे बोरधरण येथून १५ किमी आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना उपचार करून घेणे अवघड जाते. नाहक आर्थिक भुर्दंड व प्रवासाचा भार सहन करावा लागत आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)