शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

७२ तासांत ८७,२१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात गुरूवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच आरोग्य सेविकांचा समावेश असलेले एकूण १ हजार १५० चमू तयार करून त्यांच्या मार्फत हे सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. सर्वेक्षण करणाऱ्या चमूतील कोविड योद्धा प्रत्येक घरी जाणून कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला ताप, सर्दी तसेच खोकला आहेत काय याची शहानिशा करीत आहेत.

ठळक मुद्दे१,१५० चमू करतेय सर्वेक्षण । १,५०७ व्यक्तींमध्ये आढळले सर्दी, ताप, खोकल्याची सौम्य लक्षणे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्याच्या शेजारील नागपूर, अमरावती तसेच यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शिवाय वर्धा जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून गुरूवारपासून आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील ७२ तासांच्या सर्वेक्षणात ८७ हजार २१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ हजार ५०७ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप अन् खोकल्याची किरकोळ लक्षणे आढळली. या सर्व व्यक्तींवर औषधोपचार करण्यात आले असून सध्या ते ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात गुरूवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तसेच आरोग्य सेविकांचा समावेश असलेले एकूण १ हजार १५० चमू तयार करून त्यांच्या मार्फत हे सर्वेक्षणाचे काम केले जात आहे. सर्वेक्षण करणाऱ्या चमूतील कोविड योद्धा प्रत्येक घरी जाणून कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला ताप, सर्दी तसेच खोकला आहेत काय याची शहानिशा करीत आहेत. शनिवारी दुपारपर्यंत वर्धा जिल्ह्यातील या कोविड योद्धांनी ८७ हजार २१८ व्यक्तींची तपासणी केली. त्यापैकी १ हजार ५०७ व्यक्तींमध्ये ताप, सर्दी व खोकल्याची सौम्य लक्षणे आढळल्याची नोंद घेतली. या सर्व व्यक्तींवर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या माध्यमातून औषधोपचार करण्यात आला आहे. सध्या या व्यक्तींची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येते.१४ लाख लोकांपर्यंत पोहोचणार कोविड योद्धाआरोग्य विभागाचे कोविड योद्धांकडून सध्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गावागावात तसेच घराघरात जाऊन कुणाला सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आहेत काय याची माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे. वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १४ लाख असून प्रत्येक व्यक्तीची तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे.६१ व्यक्तींना होता श्वास घेण्यास त्रासलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्वास घेण्यास कुणाला त्रास आहे काय याची माहिती जाणून घेतली. या सुमारे एक महिन्यांच्या कालावधीतील सर्वेक्षणात ६१ व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पुढे आले. सदर व्यक्तींवर वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुरूवारपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवक, आरोग्य सेवक तसेच सेविकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. मागील ७२ तासांत ८७ हजार २१८ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ५०७ व्यक्तींमध्ये ताप, सर्दी व खोकल्याची सौम्य लक्षणे आढळली. या व्यक्तींवर उपचार करून त्यांना ठणठणीत करण्यात आले आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या