शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

चार उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांची पदे रिक्तच

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

नागरिकांना चांगली व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे.

सालई (कला) प्राथमिक आरोग्य केंद्र : तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही कमतरता
सेलू : नागरिकांना चांगली व तात्काळ आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. असे असले तरी जंगलव्याप्त भागातील सालई (कला) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या चार उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकाच नाही. शिवाय दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकाच अधिकाऱ्याला केंद्राचा भार सांभाळावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हाडा अंतर्गत येत असलेल्या सालई (कला) प्राथमिक केंद्रात एलएचव्ही, आरोग्य सेविका, स्विपर आदी पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे. याबाबत पंचायत समिती सदस्याने अनेकदा वरिष्ठांना निवेदन देऊन लक्ष वेधले. असे असले तरी अद्याप ही रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. यामुळे खरोखर या भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळत असेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सेलू तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय, पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, २७ उपकेंद्र, दोन आयुर्वेदिक आणि दोन अ‍ॅलोपॅथिक दवाखाने आहेत. या प्रपंचातून आरोग्य सेवा पुरविली जात आहे. १ एप्रिल १९८४ रोजी तालुक्यात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. यात झडशी व दहेगावचा समावेश आहे. १ एप्रिल १९९० रोजी सिंदी (रेल्वे) येथे निर्मिती तर सेलू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सालई (कला) येथे हलविण्यात आले. २६ जानेवारी १९९० रोजी जंगलव्याप्त भागात हे आरोग्य केंद्र सुरू झाले. सेलू येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. ११ जून २००० रोजी हमदापूर येथे पाचवे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले.
पाचपैकी चार आरोग्य केंद्रात कर्मचारी व अधिकारी आहे; पण सालई (कला) प्राथ. आरोग्य केंद्रात चार आरोग्य सेविका, एक वैद्यकीय अधिकारी आहे. सालई (पेवट) येथील आयुर्वेदिक दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी काही महिन्यांपासून दहेगाव (गो.) येथील पदभार सांभाळत आहे. यामुळे जंगलव्याप्त भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. नवरगाव, बोरी, गरमसूर व सालई (कला) येथील उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. गरमसूर येथील रुग्णांना कारंजा व नागपूर येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)