शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

पालकाला मुख्याध्यापकाने शाळेतून हाकलले

By admin | Updated: November 30, 2014 23:12 IST

मुलीला शाळेतील इतर विद्यार्थी दररोज मारहाण करतात. यामुळे मुलगी शाळेत जाणार नाही असे पालकाला म्हणाली. यावरून पालक शिक्षकांना या संदर्भात विचारणा करण्याकरिता शाळेत गेले

तळेगाव (श्यामजीपंत) : मुलीला शाळेतील इतर विद्यार्थी दररोज मारहाण करतात. यामुळे मुलगी शाळेत जाणार नाही असे पालकाला म्हणाली. यावरून पालक शिक्षकांना या संदर्भात विचारणा करण्याकरिता शाळेत गेले असता त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा मुख्याध्यापकाने त्या पालकाला हाकलून लावल्याचा प्रकार रामदरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला. या बाबतची तक्रार पालक पुरूषोत्तम दयाराम बन्नगरे यांनी गटशिक्षणाधिकारी आष्टी यांना दिली आहे.
पुरूषोत्तम बन्नगरे यांची मुलगी रामदरा जि.प.शाळेत इयत्ता चवथीत शिकत आहे. तिला शाळेतील काही विद्यार्थी दररोज मारहाण करीत असल्याची तक्रार तिने पालकाकडे केली. शिवाय मी शाळेत जाणार नाही असेही तिने म्हटले. यावर बन्नगरे यांनी शाळेमध्ये जावून विद्यार्थ्यांना शिक्षकामार्फत समजाविण्याकरिता मुख्याध्यापक कांदे यांना विनंती केली. यावर कांदे यांनी त्यांचे काही एक न ऐकता येथे काहीच बोलू नको असे म्हणत सदर पालकास शाळेतून हाकलून दिले. यापुढे शाळेत यायचे नाही. बडबड करून नकोस असे म्हणून माझे न ऐकता मला हाकलून लावल्याचे बन्नगरे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर मुख्याध्यापकाचे घर हे शाळेच्या शेजारी असल्याने मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे न देता घरातून शाळा व शाळेतून घर अशा चकरा मारत असल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.(वार्ताहर)