बिजिंगमधून वर्धेत आलेल्या १३ विद्यार्थिनींवर ठेवली पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:28+5:30

महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

He kept a watch on the 13 students who came from Beijing | बिजिंगमधून वर्धेत आलेल्या १३ विद्यार्थिनींवर ठेवली पाळत

बिजिंगमधून वर्धेत आलेल्या १३ विद्यार्थिनींवर ठेवली पाळत

Next
ठळक मुद्दे१४ दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन ‘कोरोना निगेटिव्ह’ची केली पुष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत जगात तब्बल ७१ हजार ३३० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे तर १ हजार ७७५ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर चीन येथील बिजिंग येथून वर्धा येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थिनींवर सलग १४ दिवस लक्ष ठेऊन त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची पुष्टी आरोग्य विभागातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.
महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यासह चीन मधून आलेल्या या विद्यार्थिनींना कोरोनाची लागन तर झालेली नाही तसेच लागन झाली असेल्यास हा आजार पसरू नये म्हणून दक्षता घेण्यात आली. तब्बल १४ दिवस या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. सर्वबाजू तपासल्यानंतर या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन नसल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.

बिजिंग येथील काही विद्यार्थिनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षणासाठी आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांना सलग १४ दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत ठेऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्या त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून नागरिकांनीही घाबरू नये.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

ताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

कोरोना संसर्गाची लक्षणे
ताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. चीन मध्ये या संसर्ग जन्य आजारामुळे हाहाकार माजला असला तरी भारतात अद्यापही त्याचा अतिरेक झालेला नाही. शिवाय राज्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हणने आरोग्य विभागाचे आहे.

Web Title: He kept a watch on the 13 students who came from Beijing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.