शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

भटक्यांच्या झोपड्याही झाल्या हायटेक

By admin | Updated: January 11, 2016 01:56 IST

दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आरामासोबतच मनोरंजनाचीही आवश्यकता असते. दूरदर्शनच्या विस्ताराने सर्वत्र मनोरंजनाची भूक भागत आहे.

डिजीटल इंडियाचा नारा : मनोरंजनासाठी झोपडीबाहेर डीटीएच छत्री पराग मगर वर्धादिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आरामासोबतच मनोरंजनाचीही आवश्यकता असते. दूरदर्शनच्या विस्ताराने सर्वत्र मनोरंजनाची भूक भागत आहे. याला आता भटक्या जमातींच्या झोपड्याही अपवाद राहिलेल्या नाही. एकीकडे जिल्ह्यात सेट टॉप बॉक्सअभावी नागरिकांच्या टीव्हींवर मुंग्या येण्याची वेळ आली असताना झोपड्यांमध्ये मात्र डीटीएचच्या माध्यमातून मनोरंजनाचा पर्याय शोधला जात आहे. गावागावात, शहरांत रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून भटक्या जमाती आपली राहण्याची तात्पुरती सोय करीत असतात. यातील काही जमातींचे पाल हे महिन्या-महिन्याला बदलत असतात तर काही जमाती अनेक महिने एकाच ठिकाणी आपले पाल ठोकतात. झोपडींसाठी आता व्यवस्थित अश्या कापडाचा वापर होताना दिसतो. दिवसभर राबराब राबून या नागरिकांना पोटाची खळगी भरावी लागते. त्यांची लहान मुलेही कामात हातभार लावतात. शिक्षणाचा पत्ता नसलेली लहान मुले आर्इंसोबत सरपणाची सोय करण्यासाठी दिवसभर हिंडत असतात. यातील सर्वांचिच परिस्थिती बेताची असते असे नाही. काहींचा प्रपंच व्यवस्थित सुरू असतो. सर्वच दिवस कामाचे असतातच असेही नाही. त्यामुळे काम नसताना स्वत:चे मनोरंजन कसे करावे काहींना प्रश्न असतो. त्यावर उपाय म्हणून आता भटक्यांच्या झोपडींमध्ये टिव्ही दिसत आहे. एवढेच नव्हे तर गावोगावी भटकावे लागत असल्याने केबलची झंझटच नको असे म्हणून सरळ डीटीएचच्या माध्यमातून चॅनल्स पाहिल्या जात आहेत. त्यामुळे ये-जा करताना या झोपड्यांबाहेर डीटीएचची छत्री पाहून नागरिकही अचंबित होत असतात. काही स्वत:ची परिस्थिती पाहून खजीलही होतात. पण एकंदरित डिजीटल इंडियाचा नारा पाहता या झोपड्याही हायटेक होत असल्याचे दिसते. टीव्ही पाहण्यासाठी बॅटरींचा वापरसर्वप्रथम झोपड्यांमध्ये टीव्ही व बाहेर डीटीएच छत्री पाहून जवळच्या तारांवर आकोडा तर टाकला नाही ना असा संशय येतो. पण असे नसून सरळ मोठ्या बॅटरी घेऊन त्यांनी टीव्ही पाहण्याची कायमची सोय केली आहे. १०० रुपये देऊन ही बॅटरी संपल्यावर चार्ज करून आणतात. खरा डिजीटल इंडिया भारतभर डिजीटल इंडियाचा नारा दिला जात आहे. अशा वेळी ग्रामीण भागात याचा प्रचार आणि प्रसार करण्यावरही भर दिला जात आहे. अश्या वेळी या झोपड्यांमधील डीटीएच सुविधा पाहून हाच खरा डिजीटल इंडिया असा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही.