शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 05:00 IST

शहरासह लगतच्या भागात ८४ वर हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌ असून, सर्वच हॉटेल्स आता पूर्ण क्षमेतेने सुरू झाले आहे. १३९२ च्या जवळपास या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागलेल्या हॉटेल्स व्यावसायिकांना आता दिलासा मिळाला आहे. हॉटेल व्यवसाय आता पूर्ववत उभा राहणार, असा विश्वास हॉटेलमालकांनी व्यक्त केला.

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेकंड अनलॉकनंतर शहरासह लगतच्या भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंटस्‌ आता दहापर्यंत उघडी असणार आहेत. याकरिता शासनाकडून प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण पूर्णपणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. ‘लोकमत’ चमूने यासंदर्भात शहरातील मुख्य मार्गालगत आणि वळणमार्गालगतच्या हॉटेल्समध्ये सत्यता पडताळली असता बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याचे दिसून आले. शहरासह लगतच्या भागात ८४ वर हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌ असून, सर्वच हॉटेल्स आता पूर्ण क्षमेतेने सुरू झाले आहे. १३९२ च्या जवळपास या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागलेल्या हॉटेल्स व्यावसायिकांना आता दिलासा मिळाला आहे. हॉटेल व्यवसाय आता पूर्ववत उभा राहणार, असा विश्वास हॉटेलमालकांनी व्यक्त केला.

काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी!

हॉटेल १

- वळण मार्गावरील हॉटेलला भेट देऊन तेथील कारागीर आणि कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण झाले काय याबाबत विचारणा केली असता काहींनी लसीकरण झाल्याचे तर काहींनी लसीकरणाकरिता नोंदणी केल्याचे सांगितले.

हॉटेल २

- शहरातील मुख्य मार्गालगत मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स असून, येथील कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत विचारणा केली असता लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. मोजक्याच कर्मचाऱ्यांचे लसीकरण राहिल्याचे सांगण्यात आले.

शासनाने हॉटेल व्यवसाय अटी, शर्तींच्या अधीन राहून आता १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याकरिता कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्णपणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. हॉटेलमधील ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांची लसीकरणाकरिता नोंदणी केली आहे. काेविड संकट काळात लसीकरण हे महत्त्वाचे आहेच असे सांगण्यात येते.- अजिंक्य भिसे, हॉटेलमालक, सेलू. 

लसीकरण झाले की नाही, तपासणार कोण?- सेकंड अनलॉकनंतर हॉटेल व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याकरिता लसीकरण पूर्णपणे झालेले असणे गरजेचे असल्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, लसीकरण झाले अथवा नाही, याची पडताळणी करणारी कुठलीही यंत्रणा जिल्ह्यात कार्यान्वित नाही.

रस्त्यांवर, टपऱ्यांवर आनंदी आनंद- शहरातील विविध रस्त्यांलगत आणि बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चहा, नाश्त्याच्या टपऱ्या आहेत.- अनेक चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवरील बहुतांश कारागीर आणि कामगारांचे लसीकरण झालेले नाही.- रस्त्यालगत असलेल्या चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांपर्यंत शासनाची कोणतीही यंत्रणा पोहोचली नसून जनजागृतीअभावी त्यांचे लसीकरण राहिले आहे.- लसीकरण झालेले नसतानाही चहा-नाश्त्याच्या टपऱ्यांवर कामगार कार्यरत आहेत.

 

टॅग्स :hotelहॉटेलCorona vaccineकोरोनाची लस