शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपुरातही गुटखा बंदी मोहीम

By admin | Updated: October 25, 2014 01:38 IST

येथील ठाणेदार रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार गिरडचे ठाणेदार ओमकांत चिंचोळकर यांना देण्यात आला.

समुद्रपूर : येथील ठाणेदार रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार गिरडचे ठाणेदार ओमकांत चिंचोळकर यांना देण्यात आला. त्यांनी प्रभार स्वीकारताच समुद्रपूर येथे गुटखा बंदी करण्याची कारवाई सुरू केली. तीन दिवसांत दुकानातील गुटखा नष्ट करण्याच्या सूचना देत दुकानदारांना कारवाईची तंबी दिली. सोबतच त्यांनी परिसरात स्वच्छता राबविण्याच्याही सूचना केल्यात.याच वेळी समुद्रपूर मधील चौकामधील दुकानासमोर असलेल्या कचऱ्याचे ढिग उचलविण्यास लावून स्वच्छतेची जाणीव करून दिली. पदभार स्वीकारताच बेशिस्तीत वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाची तपासणी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे वाहनचालकामध्ये दहशत निर्माण झाली. सोबत रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या वाहणावर दंडात्मक कारवाई तर रस्त्याच्या बाजूला बसलेल्या छोट्या दुकानदारांना मर्यादित दुकान लावण्याची ताकीत दिली. तर गिरडमध्ये गुटखाबंदी अभियान सुरू केल्यानंतर समुद्रपूरमध्ये सुद्धा प्रत्येक पान टपरीची तपासणी करीत यापुढे गुटखा विक्री करायची नाही, याबाबत सूचना दिली. याच वेळी त्यांनी दुकानासमोर असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांकडेहीे लक्ष वधले. दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोरील कचऱ्याचे ढिग उचलण्यास लावून त्यांना स्वच्छतेची जाणीव करून दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मोहिमेला हातभार लावला. यामुळे काही नागरिकांनी या कामाचे कौतुक केले. मात्र काही वाहन चालकांना दंडुकांचा प्रसाद खावा लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसात कायदा काय असतो, याची जाणीव प्रभारी ठाणेदारांनी करून दिली, असे बोलल्या जात आहे. या कारवाईत सातत्याची गरज असल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)