शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हाटीची वाढ झाली; पण पाती, बोंड नाममात्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST

या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांना सळो की पळो करूनच सोडले.

ठळक मुद्देऊंटावरून हाकलल्या जाताहेत शेळ्या : शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : सतत थांबुन-थांबुन होणाऱ्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीस आला. परंतु, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने व पिकाची योग्य निगा राखल्याने कपाशीच्या पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली. परंतु, सध्या बऱ्यापैकी वाढ झालेल्या पऱ्हाटीला पाहिजे त्या प्रमाणात पाती अन् बोंड लागली नसल्याने या भागातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी या परिसरातील शेतपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य सल्ला देणे गरजेचे आहे. पण अधिकाऱ्यांकडून उंटावरून शेळा हाकलण्याचा प्रकार होत असल्याची ओरड या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांना सळो की पळो करूनच सोडले. सतत पाऊस कायम राहिल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली होती. अशातच अनेक शेतशिवारांना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते.मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शिवाय पिकाची वाढ बºयापैकी झाली. असे असले तरी सध्या एका कपाशीच्या झाडाला १० ते १५ इतकीच बोंड असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील कपाशी पिकाची पाहणी करून कपाशी उत्पादकांना वेळीच योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी या भागातील शेतकºयांची आहे.सोयाबीनचा उतारा घटल्याने शेतकरी हवालदिलयंदाच्या वर्षी सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात बऱ्यापैकी घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यातच उत्पादनात घट येत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बाजापेठेत भावही कमी आहे.

टॅग्स :agricultureशेती