शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप धारकांचा वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला घेराव

By admin | Updated: August 19, 2014 23:52 IST

कृषिपंपाला पुरविल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात पवनारच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून उपस्थित अभियंत्याला

पवनार : कृषिपंपाला पुरविल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात पवनारच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून उपस्थित अभियंत्याला घेराव करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ग्रामपंचायतीच्यावतीने सहाय्य करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शेतीकरिता रोज आठच तास वीज पुरविली जाते. त्यामध्ये चार दिवस दुपारी व तीन दिवस रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. तसेच वीज पुरवठा काळात दुरूस्तीकरिता सुद्धा वीज पुरवठा बंद केली जाते. त्यामुळे आठवड्याचा विचार केला तर दररोज सरासरी फक्त सहा तास वीज मिळते, त्यातही रात्री देण्यात येणारा विजपुरवठा केव्हाही खंडीत केला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला रात्र शेतातच काढावी लागते. शिवाय लाईन मध्ये काही बिघाड झाल्यास तो दोन-दोन दिवस दुरूस्त होत नाही. या व अशा प्रकारच्या अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्यावतीने धरणे देण्यात आले.प्रथम कनिष्ठ अभियंता एस.डी.चोरे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी या संदर्भात निर्णय देण्यास असमर्थता दर्शविली. वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू. पूरी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी उपस्थितांची समज काढण्याचा प्रयत्न केला. भारनियमन ठरविणारी एक स्वतंत्र्य यंत्रणा असून मुंबई वरून वेळा ठरविल्या जातात. सदर मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवू, यावर कृषी पंप धारकांचे समाधान न झाल्याने कार्यकारी अभियंता एन.जी.वैरागडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी दिवसा वीज देऊन रात्रीचे भारनियमन घ्यावे, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, विद्युत पुरवठ्याच्या काळात झालेला बिघाड लवकर दुरूस्त करावा आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनाकरिता परिसरातील २०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, सरपंच अजय गांडोळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष जगदीश वाघमारे, श्रीकांत तोटे, नितीन कवाडे, अशोक भट, प्रमोद लाडे, दिलीप वैद्य, शालीनी आदमने, नंदा उमाटे, वर्षा बांगडे, संगीता धाकतोड, अर्चना डगवार, संगीता मेहरकूरे सर्व ग्रा.पं.सदस्य अरुण घुगरे, सुरेश इखार, सुभाष छापेकर यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग होता.(वार्ताहर)