शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा विकास शक्य

By admin | Updated: May 22, 2014 01:27 IST

विदर्भात शेतकर्‍यांकडे दरडोई शेतीचे प्रमाण चांगले आहे; पण उत्पादनात फारशी सुधारणा दिसत नाही.

वर्धा : विदर्भात शेतकर्‍यांकडे दरडोई शेतीचे प्रमाण चांगले आहे; पण उत्पादनात फारशी सुधारणा दिसत नाही. शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या अधिक आहे; पण शेतीवर काम करणार्‍यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत आपली शेती गटाच्या माध्यमातून केल्यास उत्पादन खर्चात कपात होईल व उत्पादनात वाढ होईल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍याचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन समूह शेतीचे प्रणेते कृषीभूषण नाथराव कराड इंजेगाव (बिड) यांनी केले.

जा.ब. ग्रामविकास संस्था व जिल्हा प्रकल्प आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विकास प्रशिक्षण कार्यक्रम निमसडा व टाकळी (चणा) येथे घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी गायकवाड होते.

नाथराव कराड पूढे म्हणाले की, समुहात शेतकर्‍यांना अधिक शिकता येते व अनुभवाचे आदान-प्रदान होत असल्याने नुकसान कमी होते. एकत्रीतपणे बियाणे, खतांची खरेदी व अनेक शेतीपयोगी निविष्ठांची खरेदी केल्यास २५ ते ३0 टक्केपर्यंतची बचत होऊ शकते, हे सप्रमाण त्यांनी विषद केले. शेतकर्‍यांना गारपीट, दुष्काळ, अतवृष्टी, वादळ, पूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सतत तोंड द्यावे लागते. संकटाशी सामना करताना शेतकरी हतबल होतो. आजच्या स्थितीत शेती अधिक आव्हानात्मक झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर निघायचे असेल तर शेतकर्‍यांनी समुहशेतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामुहिक माती परिक्षण, एक गाव एक वाण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आदी बाबी केल्यास पीपीपीमध्ये सहभागी संस्थांकडून उत्पादनाला ज्यादा दर प्राप्त होऊ शकते. ठिंबक सिंचनाकडे एकत्रित वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी खरीपाच्या पुर्वतयारीकरिता बियाणे, खतांच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले.

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सचिव सोहनी, गांधी विचार परिषदेचे संचालक भरत महोदय उपस्थित होते. प्रास्ताविक पानकर यांनी तर संचालन विनेश काकडे यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच प्रशांत निमसडकर, पराते, उपाध्ये, वर्‍हाडे, भोंगाडे, बन्सोड आदींनी सहकार्य केले. यावेळी टाकळी येथील शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)