शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. ने पाडली वादग्रस्त इमारत

By admin | Updated: August 24, 2014 00:10 IST

आष्टी(श.) तालुक्यातील अंतोरा येथील वासुदेव मोहोड यांची २०११ पासून वादग्रस्त असलेली इमारत न्यायालयाच्या निकालानंतर बुधवारी २० आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर ग्रामपंचायत

वर्धा : आष्टी(श.) तालुक्यातील अंतोरा येथील वासुदेव मोहोड यांची २०११ पासून वादग्रस्त असलेली इमारत न्यायालयाच्या निकालानंतर बुधवारी २० आॅगस्टच्या मध्यरात्रीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने पोकलॅण्डच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने पूर्वसूचना न देता इमारत पाडल्याने आपले ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप वासुदेव मोहोड यांनी केला आहे. अंतोरा येथील रहिवासी वासुदेव मोहोड व दुर्गा मोहोड यांना वॉर्ड क्रमांक तीनमधील भूखंड क्रमांक १२७ वरील बांधकाम अनधिकृत असल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने २६ मार्च २०११ ला नोटीस दिला होता. तसेच ते बांधकाम ३० दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मोहोड यांनी आष्टी येथील दिवाणी न्यायालयात प्रकरण प्रविष्ट केले. याविरुद्ध अंतोरा ग्रामपंचायतीने नागपूर उच्च न्यायालयात दिवाणी पुनर्विचार याचिका दाखल केली. न्यायमूर्ती ए.बी. चौधरी यांनी १६ जून २०१४ ला ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाजूने निकाल देत आष्टी(श.) न्यायालयातील खटला खारीज केला. त्यानंतर आयुक्त अप्पासाहेब धुलाज यांनी १९ आॅगस्टला ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाजूने निकाल दिला. यात मोहोड यांच्याकडे मालकी हक्काचा पुरावा नसल्याने २६ एप्रिल २०११ चा नोटीस कायम कारणार आहे. त्यानुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली, अशी माहिती न्यायालयात ग्रामपंचायतीची बाजू मांडणारे अ‍ॅड. प्रकाश गायकवाड यांनी दिली.ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच अधिकाऱ्यांना न कळविता कारवाई केली असा आरोप मोहोड यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या घरात १०० पोते सोयाबीन, ६० पोते चणा, दुचाकी व शेतोपयोगी साहित्य होते. अचानक घर पाडण्याने ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मोहोड यांचे म्हणणे आहे. या नुकसानाची भरपाई कोण देणार, न्यायालय मध्यरात्री कारवाई करण्यास सांगते काय, असे प्रश्न उपस्थित करीत न्यायालयीन प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे. अंतोरा ग्रामपंचायतीची ही कारवाई वैयक्तिक आकसातून केल्याचा आरोप वासुदेव मोहोड यांनी केला आहे.(शहर प्रतिनिधी)