शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST

बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़

दुष्काळातही आबाळ : भाव अल्प; मदत गरजेचीसेलगाव (लवणे) : बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़ यंदाही निसर्गाच्या प्रकोपामुळे पिके हातची गेली़ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत आहे़ असे असताना शासन आत्महत्यांकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत़खरीप हंगामात पाऊस उशिरा व कमी आला़ अनियमित पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. एक महिना पावसाने दडी मारल्याने पिके वाळली़ उर्वरित पिकांची वाढ झाली नाही. यामुळे उत्पन्नात मोठी घट आली़ खर्चही निघाला नाही. सोयाबीन, भुर्इंमुंग, मुंग, उडीद या पिकांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता; पण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले़ तुरीनेही किडीच्या आक्रमणामुळे खाली मान टाकली. रब्बी हंगामही निसर्गावरच अवलंबून आहे. अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी खालावली असून विहिरी, नाले कोरडे पडत आहे. यामुळे ओलित कसे करायचे, रबी हंगामही हातचा जाणार काय आदी प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ शिवाय जनावरांना चारा आणायचा कुठून, हाही प्रश्नच आहे़ स्वत:सह गुरांची सोय लावणे कठीण होत असल्याने पुढील जीवन जगावे तरी कसे, या विंवचनेत शेतकरी सापडला आहे. नैराश्यातून आत्महत्या वाढत आहेत़ राज्य व केंद्र शासन मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ शासन, प्रशासन शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ भविष्यातील अडचणींचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)