शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

शासकीय चना व तूर होतेय खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:13 IST

समाधानकारक भाव मिळत असल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी नाफेडला आपला शेतमाल विकला. ठिकठिकाणी तूर, चना व सोयाबीनची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. असे असले तरी सध्या नियोजनशुन्य कारभारामुळे येथील नाफेडच्या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना जागेवरच खराब होत आहे.

ठळक मुद्देनाफेडचा नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : समाधानकारक भाव मिळत असल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी नाफेडला आपला शेतमाल विकला. ठिकठिकाणी तूर, चना व सोयाबीनची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. असे असले तरी सध्या नियोजनशुन्य कारभारामुळे येथील नाफेडच्या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना जागेवरच खराब होत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्हा मार्केटींग फेडरेशनमार्फत समुद्रपूर येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे सब एजंट नेमुन सन २०१७-१८ या हंगामात शासनाच्या ग्रेडरच्यवतीने १३८४१.८६ क्विंटल तूर आणि ४३८२.६८ क्विंटल चना खरेदी करण्यात आला आहे. खरेदी केलेल्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी योग्य सोयी-सुविधा करण्यात आली नाही. त्यामुळे या केंद्रातील ६१ पोते तूर व २ हजार ७६ पोते चना पावसामुळे भिजून खराब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाने वर्धा जिल्हा मार्केटींग कार्यालयाला एका लेखी पत्राद्वारे शिल्लक असलेला चना व तूर तात्काळ उचलावा, अन्यथा त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाची राहील. शिवाय खरेदी-विक्री संघाचे सन २०१३-१४ पासून ते सन २०१७-१८ पर्यंतचे अनुषागिक खर्च आणि सब एजंट कमीशन ३४ लाख ७८ हजार ३८२ रुपये तसेच वाहतूक भाडे, सन २०१६-१७ चे तूर खरेदीतले ५ शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपये देण्याच्या सूचनाही देण्यात आले आहे. पण त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याने येथील अडचणी आणखीच वाढल्या आहेत.शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीची स्थितीशासनाने सोयाबीन, तूर व चना मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. सन २०१६-१७ मध्ये ३ हजार २०० शेतकºयांकडून २२ हजार १११ क्विंटल तूर, सन २०१७-१८ या हंगामात शासनाने दिलेल्या ग्रेडर मार्फत १७ फेब्रुवारी २०१८ ते १५ मे २०१८ दरम्यान १ हजार १३३ शेतकºयांकडून १३ हजार ४८१.८६ क्विंटल तूर आणि ११ मे २०१८ ते २९ मे २०१८ पर्यंत २६१ शेतकºयांकडून ४ हजार ३८२.६८ क्विंटल चना खरेदी केला आहे.पावसामुळे जागेवरच सडली तूरनाफेडने खरेदी केलेल्या तुरीच्या ढिगाला पाणी लागल्याने तूर जागेवरच सडली आहे. यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असून याकडे लक्ष देत सदर शेतमालाची उचल करण्याची मागणी आहे.समुद्रपूर खरेदी-विक्री संघाच्यावतीने नाफेडने तूर व चना खरेदी केला. मात्र, साठवलेला माल नाफेडने उचल न केल्यामुळे शेतकºयांचा शेतमाल खराब होत आहे. शिवाय संस्थेचेही देणे थकले आहे. नाफेडने खरेदी केलेल्या मालाची त्वरीत उचल करुन ख.वि.स.ची थकीत रक्कम तात्काळ द्यावी.- मोतिराम जीवतोडे, व्यवस्थापक, ख.वि.स. समुद्रपूर.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड