शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्या

By admin | Updated: April 29, 2016 02:14 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते.

जोगेंद्र कवाडे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बसविल्या होत्या कोनशिलापुलगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या शहरात २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक बुद्ध विद्या विहाराची स्वत: कोनशिला ठेवली होती. या वास्तूचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले व ते पूर्णही झाले. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार या बुद्ध विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.बुद्धविहार समितीद्वारे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या आगमन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या-त्या ठिकाणांचा बाबासाहेबांचे स्मारक म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेनुसार येथील बुद्ध विद्याविहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा. पुलगाव नगरीत डॉ. आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ ला आगमन झाले व बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच या विहाराचे भूमिपूजन केले. त्यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून सुरू झाली. तेव्हापासून व्यवस्थापक मंडळ डॉ. बाबासाहेबांचा आगमन दिन म्हणून २५ एप्रिल या दिवसाचे स्मरण करतात. ते कौतुकास पात्र आहेत. या विहाराचा प्रश्न आपण शासन दरबारी नेटाने लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आ. कवाडे यांनी अनेक राष्ट्रीय मुद्यांना हात घातला.अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. प्रेम भिमटे यांनी तरूण पिढीला डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण लिखान वाचून काढावे. युवकांनी त्यांच्या मार्गावर चालावे, असे आवाहन केले.कार्यक्र्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी केले. अहवाल वाचन अध्यक्ष हरिष नितनवरे यांनी तर संचालन सचिव गोरखनाथ मेश्राम यांनी केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. गायक प्रवीण कांबळे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)बौद्ध धर्माची दिक्षा घेण्यापूर्वीच बुद्धविहाराचे भूमिपूजनपुलगाव नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २५ एप्रिल १९५४ रोजी आगमन झाले. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यापूर्वीच बाबासाहेबांनी येथील बुद्ध विद्या विहाराचे भूमिपूजन केले. यामुळे खरी धर्मक्रांती पुलगाव नगरीपासून झाली, असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचे मतही आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. यामुळे पुलगावच्या बुद्ध विद्या विहाराला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.