शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाने भयग्रस्त झाले आहेत

ठळक मुद्देकिसान अधिकार अभियानचे धरणे आंदोलन : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.शेतकरी जंगली जनावरांच्या त्रासाने भयग्रस्त झाले आहेत. रोही, जंगली डुक्कर, निलगाय आदी वन्यप्राण्यांकडून शेतीतील उभ्या पिकांची नासाडी केली जात आहे. त्यामुळे वन्यजीव व मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी जंगलाला योग्य प्रकारे कुंपन करण्यात यावे. शेतात येणाऱ्या जंगली जनावरांना मारण्याची परवानगी शेतकरी बांधवांना देण्यात यावी. विद्युत पुरवठा दिवसाला राहत नसल्याने जीवाचा मोठा धोका पत्कारून रात्रीला शेतकऱ्यांना सिंचन करावे लागत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मागण्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्त्व किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी केले. आंदोलनात विठ्ठल झाडे, गोपाल दुधाने, गजानन गिरडे, मंगेश शेंडे, प्रशांत बोरीकर, चंदू दुर्गे, किशोर हनवते, गणेश झाडे, इरफान अली, गजानन कडू, बालू सोनटक्के, प्रविण शेळके, भाऊराव काकडे, राजु बीडकर, गजानन पाल, अरूण राऊत, संजय दुधबडे, उमेश नरांजे, धनराज डगवार, वैभव वानी, गोविंद पेटकर, मोहन निमसडे, गोविंद केळापुरे, अनंता ठाकरे, प्रफुल्ल कुकडे यांच्यासह किसान अधिकार अभियानचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.सूतकताईद्वारे नोंदविला निषेधसरकार कुठलेही असो शेतकऱ्याच्या समस्या निकाली काढण्यासाठी ते पूर्णपणे यशस्वी झालेले नाही. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध म्हणून अविनाश काकडे यांनी चरख्यावर सूतकताई केली.

टॅग्स :Socialसामाजिक