शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपो उठलाय ग्रामस्थांच्या जीवावर

By admin | Updated: May 27, 2015 01:55 IST

नगर पालिकेच्या कचरा डेपोमुळे नजीकच्या नांदगाव (बोरगाव) येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

हिंगणघाट : नगर पालिकेच्या कचरा डेपोमुळे नजीकच्या नांदगाव (बोरगाव) येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हिंगणघाट शहरातील कचरा ग्रामस्थांच्या जीवावरच उठला आहे. यामुळे हा कचरा डेपो स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटनांसह ग्रामस्थांनी केली; पण पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांद्वारे आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरालगतचा भाग म्हणून नांदगावची (बोरगाव) ओळख आहे. याच परिसरात पालिकेने कचरा डेपो थाटला असून शहरातील विविध ठिकाणाहून कचरा गोळा करून नांदगाव येथे साठविला जातो. पूर्वी या भागात फारशी वस्ती नव्हती; पण शहराचे आकारमान वाढले आणि तेथे नागरिकांची नवीन वस्ती झाली. या कचऱ्यामुळे तेथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचरा व दुर्गंधीमुळे क्षयरोग, अस्थमा, काळीव आदी आजारांची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय तेथील दूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे शुद्धीकरण केंद्र नसल्याने गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. डेपोमधील कचरा सतत जाळला जात असल्याने गावातीत वातावरणही प्रदूषित होत आहे. परिणामी, जीवघेण्या आजारांत वाढ होत आहे. कचरा डेपो स्थापन करताना हिंगणघाट पालिकेने नांदगाव ग्रा.पं. शी काही करार केले होते. त्यातील अटी व शर्थींचे पालनही पालिका प्रशासन करीत नाही. यामुळे हिंगणघाट शहरातील कचरा ग्रामस्थांच्या जीवावर उठल्याचेच दिसते. नगर परिषद प्रशासनाने ग्रामस्थांच्या आरोग्याची दखल घेऊन नांदगाव येथील कचरा डेपो दुसरीकडे हटवावा, अशी मागणीही संघटनांसह ग्रामस्थांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)