शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

गांधीवाद्यांना आत्मचिंतनाची गरज

By admin | Updated: December 21, 2015 02:22 IST

स्वातंत्र्य चळवळीतील बापूंचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार व तत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. गांधीवादी बापूंच्या विचार व कार्याचे काम करीत असले तरी आज आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

लक्ष्मीनर्सिम मूर्ती : गांधीजींच्या सहवासातील आठवणी केल्या ताज्या
दिलीप चव्हाण सेवाग्राम
स्वातंत्र्य चळवळीतील बापूंचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार व तत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. गांधीवादी बापूंच्या विचार व कार्याचे काम करीत असले तरी आज आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जगालाच बापूंच्या सत्य अहिंसा या तत्वांचा अंगिकार करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत ९६ वर्षीय लक्ष्मीनर्सिम मूर्ती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
लक्ष्मीनर्सिम मूर्ती १९४४ साली गांधी आश्रमात बापूंना भेटण्यास आले होते. स्वातंत्र्यानंतर ते आता प्रथमच आश्रमात आलेत. आश्रमातील २१ दिवसांचे स्मरण, बापूंचे कार्य आणि दैनिक कार्यक्रमाची आठवण करून त्यांनी स्मृती जागविल्या. मूळचे श्रूगेशी जि. चिकमंगलूर, कर्नाटक येथील शिक्षणासाठी ते शिमोग या ठिकाणी गेले. १९३० मध्ये गांधीजी आणि सहकाऱ्यांनी मिठाचा कायदा मोडून स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ केला. देशात गांधीजींच्या कार्याची माहिती गावोगाव कार्यकर्ते आणि पत्रकाद्वारे पोहोचवू लागले. गांधीजींच्या कार्याची माहिती मलाही होऊ लागली. काँग्रेसचे नेते पट्टा सितामैय्या यांचे भाषण मी ऐकले. यातून गांधीजींचे विचार व कार्य लक्षात आले. बापूंविषयी जेवढे ऐकता येईल तेवढा माझा प्रयत्न होता. १९४१ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश सहभागी झाला. मी तर खूपच भारावून गेलो होतो. प्रभावित झालो होतो. बापू, बा व सहकाऱ्यांच्या अटकेमुळे दुखी झालो. बापूंना भेटावे, पाहावे, ही इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना भेटण्याचा निर्णय घेऊन मी कुणालाच न सांगता सेवाग्राम आश्रम गाठले. ते साल होते १९४४, असे मूर्ती यांनी सांगितले.
दोन दिवस आश्रमात फिरलो. प्रार्थनेत सहभागी झालो. २१ दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. आश्रमातील व्यवस्था, स्वच्छता, आत्मियता आजही कायम असून त्याच पद्धती कायम ठेवल्याने आनंद झाला. कार्यकर्ता या आश्रमातून घडला पाहिजे. भ्रष्ट राजकारण, हिंसा याला थारा देणाऱ्या व वाढविणाऱ्या व्यक्ती, युवकांपर्यंत गांधी विचार व कार्य पोहोचविले पाहिजे, असे मूर्ती म्हणाले.