मेडिकल चौकात अतिक्रमणावर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:16+5:30

मेडिकल चौक व मुख्य मार्गाच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अतिक्रमण धारक व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आला. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Gajraj went on encroachment in medical square | मेडिकल चौकात अतिक्रमणावर चालला गजराज

मेडिकल चौकात अतिक्रमणावर चालला गजराज

Next
ठळक मुद्देछोट्या व्यावसायिकांची उडाली तारांबळ : बांधकाम, ग्रामपंचायत व महसूल विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील मेडिकल चौकातील अतिक्रमण मंगळवारी पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने काढले. या कारवाईमुळे छोट्या व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली होती.
मेडिकल चौक व मुख्य मार्गाच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अतिक्रमण धारक व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आला. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. या मोहिमेदरम्यान काही व्यावसायिकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य केले. तर काहीनी अतिक्रमण काढण्यास नकार दिल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रण काढण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या हटविण्यात आल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अतिक्रमण हटाव मोहीम तहसीलदार प्रिती डुडुलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय मंत्री, सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे या बड्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली.

जागेच्या कारणावरून उडाली शाब्दीक चकमक
करंजी मार्गावरील दुकाने आमच्याच जागेवर असल्याचे व्यावसायिकांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे व्यावसायिक आणि अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती; पण नंतर अधिकारीही जागा कुणाची याबाबत कागदपत्र व्यावसायिकांना दाखविल्यानंतर हा वाद निवळला.

विद्युत पुरवठा केला होता खंडित
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी या भागातील विद्युत पुरवठा मोहिम सुरू असेपर्यंत खंडित करण्यात आला होता. शिवाय महावितरणचे कर्मचारी दिवसभर मोहिमेतील अधिकाºयांसोबत होते.

न्यायालयाच्या स्थगनादेश आदेशामुळे सहा दुकानांवरील कारवाई टळली
सेवाग्राम ग्रामपंचायत, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्त रित्या मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. असे असले तरी कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रवेशद्वार जवळील सहा दुकाने उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याने हटविण्यात आली नाही. हा आदेश उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिला असल्याचे सांगण्यात आले. एकूणच या कारवाईमुळे सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांना गती मिळणार आहे.

२०१८ मध्ये उच्च न्यायालयाने त्या सहा दुकानांविषयी स्थगिती दिली आहे. शिवाय पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने ते अतिक्रमण काढण्यात आले नाही.
- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी, वर्धा.

Web Title: Gajraj went on encroachment in medical square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.