शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून गजानननगरात तणाव

By admin | Updated: August 27, 2015 02:15 IST

शहरातील गजानन नगर परिसरातील विठ्ठल मंदिर टेकडीवरील मस्जिदजवळील भागात गंगाधर पाटील नामक इसमाने येथील नागरिकांची घरे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला.

जेसीबीमार्फत घरे पाडण्याचा प्रयत्न : नागरिकांना वारंवार धमकावणीवर्धा : शहरातील गजानन नगर परिसरातील विठ्ठल मंदिर टेकडीवरील मस्जिदजवळील भागात गंगाधर पाटील नामक इसमाने येथील नागरिकांची घरे जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला होता. वारंवार हा प्रकार होत असल्याने या भागातील नागरिकही संताप व्यक्त करीत आहेत. येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधर पाटील नावाचा इसम या परिसरातील प्लॉट आपल्या मालकीचे असल्याचे सांगत नागरिकांना अनेक वर्षांपासून धाकदपट करीत आहे. दुपारी घरातील पुुरुष मंडळी बाहेर गेली असताना हा मुुद्दाम येऊन धमकी देत असल्याचेही महिला सांगतात. १० ते १५ वर्षांपासून येथे नागरिक वास्तव्यास आहेत. यात काही मुस्लिम समुदायाचीही घरे आहेत. या भागातील काही नागरिकांनी त्यांची जागा शालीग्राम संजय टिबडेवाल यांच्याकडून तर काहींनी शिवम मदनलाल यांच्याकडून जागा घेतल्याचे नागरिक सांगतात. परंतु गंगाधर पाटील मात्र ही सर्व जागा आपली असल्याने ती खाली करण्याची धमकी देत असल्याचे महिलांनी सांगितले. बुधवारी दुपारच्या वेळी पाटील याने अचानक जेसीबी घेऊन येत येथील सतीश ईंगळकर यांचे घर पाडण्याचा प्रयत्न केला. यात त्याला रोखण्याच्या नादात त्यांची पत्नी मंजुषा या जखमीही झाल्या इतरही घरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. येथील मस्जिदीवरही त्याने जेसीबी चालविण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. यादरम्यान वर्धा पोलिसांची चमू दाखल झाल्यामुळे प्रकारण निवळले. पण हा प्रकार आता नित्याचाच झाला असून यामुळे येथील महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी त्याला पोलिसांनी समज दिल्याचेही सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी) यापूर्वीही अनेकवार तक्रारी दाखलविठ्ठल मंदिर टेकडीवरील आय. टी. आय जवळ शालीग्राम तिबडेवाल यांच्याकडून काही नागरिकांनी जमिनी घेऊन पक्की घरे बांधल्याचे नागरिक सांगतात. या जागेची कागदपत्रेही त्यांच्याकडे आहेत. परंतु गंगाधर पाटील हा इसम ही सर्व जागा माझ्या मालकीची असून ती लवकर खाली करा, अशी धमकावणी अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना देत आहे. आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचेही तो सांगत असतो. येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सर्वप्रथम १२ जुलै २००७ मध्ये त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली होती. यानंतरही अनेकवार त्याने घरे पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे वारंवार पोलिसांत तक्रार केल्याचेही नागरिक सांगतात. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही नागरिक करीत आहे. बुधवारी गंगाधर पाटील याने पुन्हा जेसीबीद्वारे सतीश इंगळकर यांचे घर पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांंमुळे हा प्रकार टळला. नागरिकांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु त्यास समज दिल्याचे सांगण्यात येते.दुपारी महिलांना होतो त्रास दुपारच्या वेळेस घरातील पुरूष मंडळी ही कामानिमित्त बाहेर गेलेली असते. नेमकी हीच संधी साधत गंगाधर पाटील हा येथे येऊन धमकावणी देत असल्याचे महिला सांगतात.बुधवारी घडलेल्या प्रकारामुळे येथे पुन्हा एकवार तणाव निर्माण झाला होता. तक्रार करूनही पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याचे महिला सांगतात. पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वंदना दरवळकर, मंजुषा इंगळकर, अरविंद सायरे, राजू माने, पुरूषोत्तम कदम आदींनी केली आहे.