शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रवाल पेट्रोल पंपावर चार तास खडाजंगी

By admin | Updated: June 13, 2016 00:38 IST

तळेगाव (श्या.पं.) येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर ग्राहकांना रॉकेलमिश्रीत डिझेलचा पुरवठा होत असल्याचा प्रकार अघडकीस आला.

नमुने पोलिसांच्या स्वाधीन : रॉकेलमिश्रीत डिझेल विकल्याचा आरोपआष्टी (शहीद) : तळेगाव (श्या.पं.) येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर ग्राहकांना रॉकेलमिश्रीत डिझेलचा पुरवठा होत असल्याचा प्रकार अघडकीस आला. याचा जाब विचाराला गेलेले वाहन मालक व पेट्रोल पंपधारक यांच्यात तब्बल चार तास खडाजंगी झाली. शेवटी डिझेलचे नमुने घेवून तळेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना शनिवारी घडली.अग्रवाल पेट्रोल एजन्सी तळेगाव यांच्याकडे अकोला (गायगाव) येथून डिझेलचा पुरवठा होतो. सदर डिझेल ग्राहकांना विकल्या जाते. आष्टी येथील विपीन उमाळे यांनी त्यांच्या एमएच ३२ वाय ७११७ या वाहनात डिझेल भरले. ते येथील नियमित ग्राहक आहेत. नवीन घेतलेल्या गाडीचे अवघ्या दोन महिन्यात इंजीन खराब झाले. त्यांनी याची तपासणी केली असता डिझेलमध्ये रॉकेल असल्याचे निष्पन्न झाले. असाच प्रकार आर्वी येथील हितेश भुतडा यांच्याशी घडला. त्यांनी एमएच ३२ वाय २२०१ या वाहनात २० लिटर डिझेल भरले. यात रॉकेल निघाल्याने त्यांच्याही गाडीचे इंजिन खराब झाले. संतप्त दोन्ही वाहनमालकांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता आणखी २० लिटर डिझेल विकत घेतले. यामध्ये जास्त प्रमाणात रॉकेल आढळून आले.ग्राहक विपीन उमाळे व हितेश भुतडा यांनी पेट्रोलपंपमालक गोपालकृष्ण अग्रवाल यांना विचारले असता असा काही प्रकार नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली. यावेळी दोन्ही ग्राहकांनी पेट्रोलपंपावर ठिय्या मांडला. याची माहिती होताच ग्राहक प्रवीण शेटे, प्रतिक माणिकपुरे, राजेश गोरे हे सुद्धा आले. या सर्वांनी पेट्रोलपंपमालकाला धारेवर धरत याची माहिती तहसीलदार गजभिये यांना दिली. मात्र त्यांच्या भावाचे लग्न असल्याने त्यांनी येण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला. उपविभागीय महसूल अधिकारी आर्वीचे मनोहर चव्हाण यांना बोलाविले असता त्यांनीही येण्यास नकार दिला.