शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

चार एकर शेतात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 19, 2017 00:22 IST

आठ दिवसांपूर्वी वाई गावातील शेतकऱ्याचा रानडुकरांनी हल्ला करून बळी घेतला.

शेतकऱ्यांचे नुकसान : तूर, कपाशीचे पीक केले नष्ट रोहणा : आठ दिवसांपूर्वी वाई गावातील शेतकऱ्याचा रानडुकरांनी हल्ला करून बळी घेतला. त्याच गावातील शेतकरी पुंडलिक गजकेश्वर यांच्या चार एकर शेतात रानडुकरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. कापणीला आलेली तूर व वेचणीला आलेल्या कापसाची रात्री नासाडी केली. यामुळे झालेला खर्च कसा भरून निघेल, बँकांचे कर्ज व उधारी कशी फेडावी तथा संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. वाई येथील पुंडलिक गजकेश्वर यांचे वाई शिवारात सर्व्हे क्र. ४५ मध्ये १.२४ हेक्टर शेत आहे. त्यांनी या शेतात तूर व कपाशीचे पीक घेतले होते. तुरीचे पीक कापणीचा आले होते तर अद्याप अर्धा कापूस निघायचा होता. कापसाचा वेचा फुटला होता. अशावेळी रात्री या शेतात रानडुकरांच्या कळपाने धुडगूस घालत संपूर्ण पीक नष्ट केले. यात शेतकऱ्याचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी कष्टाने पीक घेत आहे. त्याचे रक्षण करताना स्वत:चा जीव धोक्यात घालतो; पण श्वापदांमुळे पीक नष्ट होते. रोहणा परिसरातील वाई, पिंपळधरी या जंगलव्याप्त भागात गत काही दिवसांपासून जंगली श्वापदांचा हैदोस वाढला आहे. आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यावर तुरीची कापणी करीत असताना रानडुकरांनी हल्ला करीत ठार केले. एक महिन्यापूर्वी याच शेत शिवारातील फनिंद्र रघाटाटे व अभिजीत बुरघाटे यांच्या शेतातील पिकांची नासधूस रानडुक्कर व रोह्यांनी केले. गजकेश्वर हे अल्पभूधारक व गरीब शेतकरी असून नुकसानामुळे ते खचले. वनविभागाने या प्रकरणात त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)