शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत २४ तास वीज देण्याचा विसर

By admin | Updated: November 4, 2016 01:48 IST

गणपती व नवरात्रोत्सवात २४ तास विद्युत देण्यात आली. परंतु, ऐन दिवाळीतच वेळी अवेळी

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना फटकारोहणा : गणपती व नवरात्रोत्सवात २४ तास विद्युत देण्यात आली. परंतु, ऐन दिवाळीतच वेळी अवेळी विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात असल्याने गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. सदर प्रकारामुळे महावितरण कंपनीबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे. याकडे संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत दिवाळीच्या दिवसात २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी विद्युत वितरण कंपनीच्या वतीने गणपती, नवरात्र व दिवाळी या उत्सवाच्यावेळी २४ तास विद्युत देऊन उत्सव भेटच दिली जात होती. सदर सुविधा रबी हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत होती. वेळीच विद्युत पुरवठा सुरळीत राहत असल्याने शेतकऱ्यांनाही ओलीताची कामे पूर्ण करता येत होती. मात्र, सध्या कधी दिवसाला तर कधी रात्रीला विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणित वाढ झाली आहे. यावर्षीच्या दिवाळी पर्वावर नियमित विद्युत पुरवठा महावितरण कंपनी करेल ही शेतकऱ्यांना आशा होती. तूर व कपाशीच्या पिकाला पाण्याची गरज असतानाच विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. वेळीच पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट येईल, असे शेतकरी सांगतात. यंदा सुरूवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असलेल्याची ओरड असतानाच आता महाविरणही विद्युत पुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. विद्युत पुरवठा नसल्याचा सर्वाधिक त्रास लहान मुलं व वृद्धांना सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)