शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

निम्नवर्धा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 02:16 IST

निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करताना प्रत्यक्ष ६६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणे हे मूळ उद्दिष्ट आहे. येत्या तीन वर्षात कालबद्ध कार्यक्रमानुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.

देवेंद्र फडणवीस : ६६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारवर्धा : निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करताना प्रत्यक्ष ६६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणे हे मूळ उद्दिष्ट आहे. येत्या तीन वर्षात कालबद्ध कार्यक्रमानुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. पुनर्वसनासह प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देवून प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली. या सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन व उपलब्ध करून देण्यात आलेल्या नागरी सुविधाबद्दलही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, आमदार अमर काळे, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार, विरेंद्र जगताप, माजी खासदार विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, मतद पुनर्र्वसन सचिव के. एच. गोविंदराज, जलसंपदा सचिव एस.एम. उपासे, उपसचिव जोशी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, अमरावतीचे ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आकाश सुर्वे, ढंगारे व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.निम्न वर्धा सिंचन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पामुळे बाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मुख्य अभियंत्यांना या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचा नव्याने अभ्यास करून दोन महिन्यात उपाय योजनाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.प्रकल्प पूर्ण करताना प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनाला प्राधान्य देवून यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. यापूर्वी पुनर्वसनाचे काम योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. प्रकल्पाग्रस्तांच्या १८ सुविधाबाबत सर्व कामे दर्जेदार व्हावीत यासाठी विकासाकडे येत्या पाच वर्षांत लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केली.