शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातच नियमांकडे पाठ; कशी रोखणार तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत असून सीएसच्या दुर्लक्षित धोरणामुळेच रुग्णांनाही नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. जिल्हा सध्या तापाने फणफणत असून दररोज अनेक नागरिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. एखादी कोविडबाधित अनवधानाने इतर रुग्णाच्या संपर्कात आल्यास रुग्णालयच कोविडचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकट काळात गरजू आणि गरिबांसाठी उपयुक्त ठरलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कोविड नियमांकडेच पाठ दाखविली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर क्रमप्राप्त करण्यात आला असला तरी, या ठिकाणी येणाऱ्या अनेक व्यक्ती विनामास्क रुग्णालयात वावरतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत असून सीएसच्या दुर्लक्षित धोरणामुळेच रुग्णांनाही नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. जिल्हा सध्या तापाने फणफणत असून दररोज अनेक नागरिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. एखादी कोविडबाधित अनवधानाने इतर रुग्णाच्या संपर्कात आल्यास रुग्णालयच कोविडचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ओपीडी फुल्ल- जिल्ह्यात सध्या व्हायरल फ्ल्यू तसेच डेंग्यू या आजाराने बऱ्यापैकी डोके वर काढले आहे. - जिल्ह्यातील खासगी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी सध्या तापाच्या रुग्णांमुळे फुल्ल झाली आहे.- असे असले तरी, या ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांना बगल दिली जात असल्याचे बघावयास मिळाले.- ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर अजूनही मास्कचा वापर करीत असले तरी रुग्ण दुर्लक्षच करतात.

सोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिवर क्लिनिक, तसेच रक्त तपासणी विभागात रुग्णांची दररोज तोबा गर्दी होत आहे. परंतु, याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला बगल दिली जात आहे. 

डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले- नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी, जिल्ह्यात आतापर्यंत १९६ डेंग्यूबाधितांची नोंद घेण्यात आली आहे. डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही कीटकजन्य आजार जिल्ह्यात कासवगतीने आपले पाय पसरत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.

रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेत...

- जिल्हा सामान्य रुग्णालयात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदी कोविड नियमांना बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयात कोविडचे संशयित रुग्णही उपचारासाठी येतात. परंतु, नियमांना बगल दिली जात असल्याने हे रुग्णालय कोविडचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

काहींच्या तोंडाला मास्क नाहीचजिल्हा सामान्य रुग्णालयातील फिवर क्लिनिक या विभागात संशयित कोविडबाधितही उपचार घेण्यासाठी येतात. परंतु, या ठिकाणी येणारे अनेकजण तोंडाला मास्कच लावत नसल्याचे दिसून आले.

सीएसला फोन उचलण्याची ॲलर्जी- जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिली जात असल्याने याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी फोन स्वीकारला नाही. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्याची बाजू जाणून घेता आली नाही.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या