शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाच झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Updated: September 29, 2014 23:09 IST

बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदान लगतच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत एकाच रांगेत असलेल्या चार झोपड्यांचा कोळसा झाला तर अन्य एक घर थोडक्यात बचावले.

बोरगाव (मेघे) झोपडपट्टीत आग : घरातील अन्नधान्यासह सर्वच साहित्याची राखवर्धा : बोरगाव (मेघे) परिसरात असलेल्या गिट्टी खदान लगतच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीत एकाच रांगेत असलेल्या चार झोपड्यांचा कोळसा झाला तर अन्य एक घर थोडक्यात बचावले. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. केवळ अर्ध्यां तासात या चार झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी येत त्यांचा कोळसा झाला. तर पाचव्या घराची एक भिंत आगीच्या विळख्यात आली. सकाळी १० वाजताच्या सुमारास या भागातील नागरिक कामाला जाण्याची वेळ असताना अचानक आग लागल्याची वार्ता परिसरात पसरली. नागरिकांनी आग लागल्याच्या ठिकाणाकडे धाव घेतली. यात एका ओळीत असलेल्या चार झोपड्या आगीच्या विळख्यात आल्याचे साऱ्यांच्या निर्शनात आले. पाहता पाहता येथील गंगुबाई, शबनम जावेद अली, किरण राजू रामटेके, अर्चना हनुमंत आमझरे यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्याचा कोळसा झाला. तर विठ्ठल मसराम यांच्या घराला आगीने विळख्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीवर ताबा मिळविण्यात यश आल्याने त्यांच्या घराला विशेष हानी पोहोचली नाही. रस्त्याच्या कडेला असलेली त्यांच्या घराची एक भिंतीचे आगीमुळे नुकसान झाले. यात सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीची माहिती परिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. ही आग विझविण्याकरिता परिसरातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन बंब येण्यापूर्वी नागरिकांनी जवळच असलेल्या हातपंपावरून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. या झोपड्या केवळ लाकूड, ताटवे व प्लास्टिकपासून तयार असल्याने आग वाढतच होती. यावर ताबा मिळविणे कठीण जात होते. पोलिसांकडून माहिती मिळताच वर्धा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब निघाला; घटनास्थळी पोहोचण्याकरिता त्याला विलंब झाला. बंब पोहोचेपर्यंत आगीने चार झोपड्या कवेत घेतल्या. यात घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. जेवणाकरिता वा अंगावार घालण्याकरिता एक कपडाही या घरात शिल्लक राहिला नाही. आग विझविण्याकरिता येथील पालिका व उत्तम गॅल्वा कंपनीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले होते. सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद शहर ठाण्यात करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)