शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या पेपरला ५११, दुसऱ्याला ५२६ विद्यार्थ्यांनी मारली दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची महामारी आणि पूरपरिस्थिमुळे तब्बल तिनदा पुढे ढकलण्यात आलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा आज जिल्ह्यातील ७४ केंद्रावर शांततेत पार पडली. दोन पाळीत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित होते. या परीक्षेदरम्यान प्रत्येक केंद्रावर पोलिसांचीही सुरक्षा होती.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते. तर दुपारी १.३० ते ३.०० वाजेदरम्यान झालेल्या दुसऱ्या पेपरला पाचवीचे ३०२ तर आठवीचे २२४ असे ५२६ विद्यार्थी गैरहजर होते. पहिल्या पेपर पेक्षा दुसऱ्या पेपरला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. परीक्षा शांततेप पार पडावी याकरिता शिक्षण विभागाकडून दहा भरारी पथक नेमन्यात आले होते. या पथकांनी तालुकास्तरावरही भेटी देवून केंंद्रावरील परिस्थितींचा आढावा घेतला. सर्वच परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा सुरळीत पार पडली.

   स्वच्छतेचा अभाव- शिष्यवृत्ती परीक्षेकरिता वर्धा शहरातील न्यू इंग्लिश कॉन्व्हेटेही परीक्षा केंद्र होते. बऱ्याच दिवसांपासून शाळा बंद असल्याने वर्ग खोल्यांच्या स्वच्छतेअभावी जाळे लागलेले आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशी तक्रार पालकांनी लोकमतकडे केली. पण, स्वच्छतेचा विषय सोडला तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, असे निदर्शनास आले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा