लसणपुरात अग्नितांडव; चार गोठे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:26+5:30

गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Fire in Lasanpur | लसणपुरात अग्नितांडव; चार गोठे भस्मसात

लसणपुरात अग्नितांडव; चार गोठे भस्मसात

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : आगीचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : तालुक्याच्या लसणपूर येथे मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत चार गोठे जळून भस्मसात झाले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आग नेमकी अशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या गोठ्यांमध्ये शेतीउपयोगी साहित्य होते. त्यालाही आगीने आपल्या कवेत घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लसणपूर येथे गावापासून काही अंतरावर असलेल्या या गोठ्यांना अचानक आग लागली. गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुमारे चार तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीत स्प्रिंकलर, प्लास्टिक पाईप आणि इतर साहित्य जळाल्याने शेतकरी अजाब येलमुले, नारायण रायफुले, भारत पोले यांच्यासह एका शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेची महसूल प्रशासनाने नोंद घेतली आहे.
 

Web Title: Fire in Lasanpur

टॅग्स :fireआग