शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच कलिंगड विकून साधली आर्थिक प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

अप्पर वर्धा धरणाच्या पायथ्याशी बेलोरा (बुजरूक) गाव वसले आहे. वर्धा नदीपात्राला लागून सुपीक शेती आहे. येथील शेतकरी वीरेंद्र जाणे, उमेश जाणे, अरुण जाणे, मधुकर जाणे, नकुल जाणे, हरिदास बोरवार, अजय जाणे, प्रमोद जाणे, हुकूम जाणे या नऊ जणांनी प्रत्येकी एक एकर याप्रमाणे नऊ एकरात कलिंगडाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. शेतीची मशागत करीत लागवड केली. उत्पन्न आल्यावर व्यापारी गावात आले.

ठळक मुद्देबेलोऱ्यातील नऊ शेतकऱ्यांचा प्रयोग : दलालांना माल देण्याचा प्रस्ताव नाकारला

अमोल सोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.): बेलोरा येथील नऊ शेतकºयांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर तळपत्या उन्हात कलिंगडाची शेती फुलविली. व्यापाºयांना शेतमाल न देता अगदी स्वस्त दरात घरपोच विकला. ऐन कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक प्रगती साधणाºया शेतकºयांनी या निमित्ताने नवा आदर्श निर्माण केला आहे.अप्पर वर्धा धरणाच्या पायथ्याशी बेलोरा (बुजरूक) गाव वसले आहे. वर्धा नदीपात्राला लागून सुपीक शेती आहे. येथील शेतकरी वीरेंद्र जाणे, उमेश जाणे, अरुण जाणे, मधुकर जाणे, नकुल जाणे, हरिदास बोरवार, अजय जाणे, प्रमोद जाणे, हुकूम जाणे या नऊ जणांनी प्रत्येकी एक एकर याप्रमाणे नऊ एकरात कलिंगडाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. शेतीची मशागत करीत लागवड केली. उत्पन्न आल्यावर व्यापारी गावात आले. त्यांनी पाच रुपये या कवडीमोल भावात कलिंगड मागितले. मात्र, शेतकºयांनी कोरोनामुळे गेल्या पावणेदोन महिन्यांपासून घरीच असलेल्या आष्टी तालुक्यातील नागरिकांना अवघ्या दहा रुपये किलोने कलिंगड विकायचे ठरविले. यासाठी एकूण १८ जणांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत मालवाहू गाडीच्या कलिंगड नेले. सहाय्याने सोशल डिस्टन्सिंग पाळून घरोघरी कलिंगडची विक्री केली. नागरिकांनी ३० रुपये किलोचे कलिंगड अवघ्या १० रुपयांना मिळत असल्याने नागरिकांनी खरेदीला पसंती दिली. त्यामधून लागवडीचा खर्चही निघाला, शिवाय आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. गावातील तरूणांना रोजगारसुद्धा दिला. या शेतकºयांना परवाना देण्यासाठी प्रा. रवींद्र जाणे, सरपंच मिलिंद जाणे, ग्रामसेविका भाग्यशाली गवई यांनी सहकार्य केले.सोशल मीडियाचा वापरतालुक्यात कोणत्या दिवशी कुण्या गावात जायचे, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार करून संदेशवहन करण्यात आले. माहिती असल्याने कलिंगडाची गाडी घरासमोर लावताच ते खरेदी केले. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बेलोरा पॅटर्न यशस्वी झाल्याने बाकी शेतकºयांनी आदर्श घेऊन स्वत:च माल विक्रीचे जाळे उभारावे, असे कलिंगड उत्पादक शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी