शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटातून सामाजिक जीवनाचा चेहरा हरविला

By admin | Updated: September 29, 2014 23:09 IST

भारतीय सिनेमाच्या कालखंडात सन १९७० पासून सामाजिक सिनेमाचा बोलबाला होता. चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. यातून सामाजिक बदल घडवून आणता येतात; मात्र आजच्या घडीला या माध्यमाचा काही

वर्धा : भारतीय सिनेमाच्या कालखंडात सन १९७० पासून सामाजिक सिनेमाचा बोलबाला होता. चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. यातून सामाजिक बदल घडवून आणता येतात; मात्र आजच्या घडीला या माध्यमाचा काही लोक दुरुपयोग करत आहेत. आजच्या काळात मनोरंजनप्रधान चित्रपट जास्त प्रमाणात तयार होत आहे. भारतीय चित्रपटातील सामाजिक जीवनाचा चेहरा आता हरवत आहे, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेते ओम पुरी यांनी व्यक्त केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील नाट्यकला व फिल्म अध्ययन विभागाच्या वतीने २९, ३० सप्टेंबर ते १ आॅक्टोबर रोजी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाच्या उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र होते. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्म प्रभागचे महानिदेशक व्ही. एस. कुंडू, एफ. टी. आय. आय. पुण्याचे सिनेमेटोग्राफीचे भरत नेरकर आणि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र व्यासपीठावर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेअभिनेता ओम पुरी यांना कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र यांच्या हस्ते सत्यजित राय सन्मान देऊन गौरविण्यात आले. या समारोहात फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेल्या उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. महोत्सवात जवळपास २२ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र म्हणाले, ओम पुरी प्रत्येक प्रकारची पात्रे उभी करतात. ते अभिनयात तल्लीत हऊन पात्रांना न्याय देतात. उद्घाटन कार्यक्रमात फिल्म प्रभागचे महानिदेशक व्ही. कुंडू तथा एफ.डी.आय. पुणेचे सिनेमेटोग्राफीचे भरत नेरकर, प्रफुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र यांनीही संबोधित केले. संचालन नाट्यकला व फिल्म अध्ययन विभागाचे अधिष्ठाता प्रा. सुरेश शर्मा यांनी केले.(प्रतिनिधी)