शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

गणित-विज्ञानच्या ४२ जागा भरणार

By admin | Updated: May 10, 2017 00:36 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांत गणित आणि विज्ञानाचा भार समाजशास्त्राच्या शिक्षकांवर आहे. ते तो पेलतही आहेत

पूर्ण जागा भरल्यास समाजशास्त्राचे शिक्षक ठरणार अतिरिक्त लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांत गणित आणि विज्ञानाचा भार समाजशास्त्राच्या शिक्षकांवर आहे. ते तो पेलतही आहेत. दरम्यान शासनाच्या आदेशानुसार या जागांवर शिक्षकांतूनच बारावी किंवा बीएससी विज्ञान असलेल्या शिक्षकांना नियुक्त करण्याच्या सूचना आल्या. यानुसार कारवाई केल्यास जिल्ह्यात समाजशास्त्राचे १९० शिक्षक अतिरिक्त ठरतात. हे शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांच्या समायोजनाची समस्या निर्माण होणार असे म्हणत शिक्षण विभागाकडून पूर्णत: रिक्त असलेल्या ४२ जागा भरण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांत समाजशास्त्राच्या शिक्षकांकडून गणित आणि विज्ञान विषय शिकविल्या जात आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिकविण्यातही येत आहे. आता नव्या आदेशानुसार कारवाई केल्यास त्यांच्यावर अतिरिक्त होण्याची वेळ येणार आहे. मग ज्या वेळी शासनाला गरज होती त्यावेळी ती आम्ही भागविली ही आमची चूक होती काय, असा सवाल या शिक्षकांनी केला. याला जिल्ह्यातील शिक्षकांच्या संघटनांनीही सहकार्य केले. यावरून सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांच्या कक्षात सभा झाली. ही सभा या विषयावर चांगलीच गाजली. शिक्षकांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर अतिरिक्त होण्याची वेळ येणार नाही, असे ठरविण्यात आले. जिल्ह्यात त्या शाळेत गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसतील अशा एकूण ४२ शाळांतच गणित शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले. या सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी किसन शेंडे, प्राथमिक शिक्षक संघाचे लोमेश वऱ्हाडे, शिक्षक समितीचे विजय कोंबे यांच्यासह अनेक समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या जागा भरल्यास अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची समस्या निर्माण होणार असल्याने सुरू असलेले काम तसेच सुरू ठेवावे असा निर्णय घेण्यात आला. शिवाय याच विषयाचा अतिरिक्त भार असलेल्या तब्बल ४६ शिक्षकांचेही समायोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. २१ सहायक शिक्षक झाले मुख्याध्यापक शिक्षण कायद्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील तब्बल ५४ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यांना सहायक शिक्षकांचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. यावर आता निर्णय झाला असून यातील तब्बल २१ शिक्षकांना परत मुख्याध्यापकाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांना दिलेल्या गावी तत्काळ रूजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. विषय शिक्षकांच्या नियुक्तीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक झाली. या बैठकीत स्थिती जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला. यात रिक्त असलेल्या ४२ जागा भरणार आहे. यामुळे कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरणार नाही. पदभार असलेल्या ४६ शिक्षकांचेही समायोजन करण्यात येणार आहे. - किसन शेंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), वर्धा.