शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पंधरा गुन्हेगारांना केले स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST

शहर पोलिसांनी लागलीच पंधरा गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. वर्ध्यात कारवाई झाली पण, जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना अद्यापही कारवाईचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही. जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु झाल्यानंतरही अट्टल गुन्हेगार मोकळे फिरत आहे. त्यांच्यापासून या उत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देशहर पोलिसांची कारवाई : अखेर प्रशासनाला आली जाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे सण-उत्सवाच्या कालावधीत शांतता भंग होण्याची शक्यता असतानाही पोलिसांचे अट्टल गुन्हेगाराकडे लक्ष नव्हते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पोलीस प्रशासनाला जाग आली. शहर पोलिसांनी लागलीच पंधरा गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. वर्ध्यात कारवाई झाली पण, जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना अद्यापही कारवाईचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही.जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु झाल्यानंतरही अट्टल गुन्हेगार मोकळे फिरत आहे. त्यांच्यापासून या उत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता होती. याच अनुशंगाने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ‘अवैध धंद्यासह गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांचे धाडसत्र केव्हा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.त्यानंतर दोन दिवसातच शहर पोलिसांनी धाडसत्र राबवून गणेश विसर्जनासह इतरही सण-उत्सव शांततेत व्हावा म्हणून १५ गुन्हेगारांना स्थानबद्ध तसेच १४ सप्टेंंबरपर्यंत शहरात प्रवेश बंदीचा आदेशही दिला आहे. यामध्ये शहरातील राजेश उर्फ राज्या उर्फ जितेश सुरेश बालवे (३०) रा. देवळी नाका, बालद शिवचरण शाहू (२४) रा. मालगुजारीपुरा, अभय बंसीलाल सोरटे (४०), रा. हवालदारपूरा, दशरथ नारायन मुळे (२८) रा. आर्वीनाका, रामु किसन सातपुते (२८) रा. आर्वीनाका, मनोज हरीचंद्र पाला (४८) व संजय हरीचंद्र पाला (३४) दोघे राहणार कंजर मोहल्ला इतवारा, सचिन बारकु मसराम (३७) रा. इतवारा, रवि गणेशलाल शाहू (४२) रा. महादेवपुरा, पप्पू बाबाराव कांबडे (३०) रा. स्टेशनफैल, निलेश मनोहर बालमांडरे (३५) रा. आनंदनगर, धिरज श्याम गौतम (२३), राकेश मुन्ना पांडे (२८), लियाकत अली निसार अली (३५),व श्रदानंद संतोष कंजरभट (२१) सर्व राहणार इतवारा बाजार, या आरोपींचा समावेश आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी व डी.बी.पथकाने केली.