शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षकाचे ‘एफबी’ अकाऊंट हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

ठाकूर यांचे हॅक केलेले फेसबुक अकाऊंटचा वापर करून अनेकांशी आरोपीने चाटींग केली. या चाटींग दरम्यान हॅकरने महत्त्वाच्या कामासाठी पैशाची मागणी करीत एक बँक खाते क्रमांक देत ऑनलाईन पद्धतीने यात पैसे टाकण्याचे सूचविले. हॅकरच्या याच खोट्या बतावणीला चैतन्य गावंडे हा बळी पडला. त्याने हॅकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन १५ हजाराची रक्कम ऑनलाईन पद्धीने हॅकरने दिलेल्या बँक खात्यात वळती केल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले.

ठळक मुद्देसायबर सेलकडे तक्रार : हॅकरने अनेकांना केली पैशाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा न.प. आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षक अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने ठाकूर यांच्या फ्रेन्ड लिस्ट मध्ये असलेल्या व्यक्तींशी चाटींग करून अतिशय महत्त्वाचे काम असल्याचे सांगत अनेकांना पैशाची मागणी केली. हॅकरच्या या खोट्या बतावणीला ठाकूर यांचे निकटवर्तीय चैतन्य गावंडे बळी पडले असून त्यांची १५ हजाराने फसवणूक करण्यात आली आहे.ठाकूर यांचे हॅक केलेले फेसबुक अकाऊंटचा वापर करून अनेकांशी आरोपीने चाटींग केली. या चाटींग दरम्यान हॅकरने महत्त्वाच्या कामासाठी पैशाची मागणी करीत एक बँक खाते क्रमांक देत ऑनलाईन पद्धतीने यात पैसे टाकण्याचे सूचविले. हॅकरच्या याच खोट्या बतावणीला चैतन्य गावंडे हा बळी पडला. त्याने हॅकरच्या म्हणण्यावर विश्वास ठेऊन १५ हजाराची रक्कम ऑनलाईन पद्धीने हॅकरने दिलेल्या बँक खात्यात वळती केल्याचे अशोक ठाकूर यांनी सांगितले. मध्यरात्रीपासून अनेकांचे फोन आल्यानंतर आपले फ्रेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच अशोक ठाकूर यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यानंतर सायबर सेल मधील तज्ज्ञांनी हॅक झालेल्या फ्रेसबुक अकाऊंटचा युजर व पासवर्ड क्रमांक बदलून दिला. शिवाय सदर प्रकार नेमका काय याची चौकशी सुरू केली आहे.हॅकरने केला दिग्गजांशी संवादअशोक ठाकूर यांच्या फेसबुक वरील फ्रेड लिस्टमध्ये असलेल्या माजी नगराध्यक्ष निरज गुजर, कंत्राटदार बाबा जाकीर, भाजप शहर प्रमुखाचे पुत्र अंकीत परियाल, किराणा व्यावसायीक मिलिंद गांधी, माजी नगरसेविकेचे पुत्र अमित जैन, शिवाय एक पत्रकार या वर्धा शहरातील दिग्गजांसह ठाकूर यांच्या निकटवर्तीयांशी फेसबुक चाटींगद्वारे संवाद साधून पैशाची मागणी केली.वर्धा न.प. आरोग्य विभागातील मुख्य पर्यवेक्षक अशोक ठाकूर यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक करून त्यांच्या फ्रेड लिस्टमधील व्यक्तींना पैशाची मागणी केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या फेसबुकचा युजर व पासवर्ड बदलून देण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येईल.- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, वर्धा.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमFacebookफेसबुक