शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय उधारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:06+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतकऱ्यांना देताना तीन ते चार दिवस पुढील तारीख टाकून धनादेश शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.

Farmers are beginning to develop cotton | शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय उधारीत

शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतोय उधारीत

Next
ठळक मुद्देसेलूच्या बाजारपेठेतील प्रकार : समिती प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा कापूस सेलूच्या बाजारपेठेत उधारीवर विकण्याची वेळ आली असून याकडे बाजार समिती लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू बाजारपेठेत कापूस पणन महासंघाची व व्यापाऱ्यांची खरेदी आहे. स्द्यस्थितीत कापसाची पाहिजे तेवढी आवक नाही. येणाऱ्या कापूस गाड्यांपैकी निम्म्या गाड्या कापूस पणन महासंघाला जात असताना खासगी व्यापारी मात्र कापसाचा धनादेश शेतकऱ्यांना देताना तीन ते चार दिवस पुढील तारीख टाकून धनादेश शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकल्याच्या दिवसापासून धनादेश ठवण्यास आठ दिवस लागत आहे. तर कापूस विकताच नगदी चुकारा पाहिजे असल्यास काही खासगी व्यापारी एक क्विंटलवर साठ रुपये कापून चुकारा देत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशाप्रकारे सुरुवातीलाच हा प्रकार सुरू झाल्याने कदाचित या बाजारपेठेतील कापसाची आवक कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कापूस ज्या दिवशी विकला, त्या तारखेचा चेक शेतकऱ्यांना द्यावा, अशी चर्चा शेतकरी लिलावाच्या ठिकाणी करताना दिसले.

सोयाबीनचे भाव गेले चार हजारांवर
आर्वी : उत्पादनात एकरी घट आली. तसेच शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची आराजी अपेक्षित न लागल्याने उत्पादनावर परिणाम झाला. बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली. मात्र, याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. आर्वी बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयाबीनला सर्वाधिक ४ हजार १५० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.
खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून सोयाबीन पीक ओळखले जाते. मात्र, यावर्षी सततच्या पावसाने सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला. परिणामी त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम झाला. आराजी घसरली व ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने कमी किमतीत सोयाबीनची कापणी केली. सोयाबीनच्या दाण्यांमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी असल्याने त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे दरही चांगले मिळाले.

Web Title: Farmers are beginning to develop cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस